दारूच्या शोधामुळे गेला दोन जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 12:12 IST2018-03-02T12:12:35+5:302018-03-02T12:12:35+5:30

पार्टीसाठी दारू कमी पडली म्हणून मध्यरात्री भरधाव वेगाने मोटार चालवणं दोन जणांच्या जिवावर बेतले आहे.

Two people died in road accident in search of alcohol at Pune | दारूच्या शोधामुळे गेला दोन जणांचा बळी

दारूच्या शोधामुळे गेला दोन जणांचा बळी

पुणे - पार्टीसाठी दारू कमी पडली म्हणून मध्यरात्री भरधाव वेगाने मोटार चालवणं दोन जणांच्या जिवावर बेतले आहे. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कात्रज नऱ्हे रस्त्यावरील शुक्रवारी (2 मार्च) पहाटे हा अपघात घडला आहे. आशुतोष मोहन यादव (वय 35, सांगली) व निखिल दिलीप चौगुले (वय 30, कोल्हापूर) अशी मृतांची नावं आहेत. 

नियंत्रण सुटल्यानं मोटार लोखंडी टॉवरला धडकून अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच मित्र गुरुवारी (1 मार्च) रात्री पार्टी करत होते. पार्टी करताना दारू संपल्यानं हे सर्वजण रात्री मोटारीतून कात्रजहून नऱ्हेच्या दिशेनं निघाले होते. यादरम्यान पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास आंबेगाव येथील शिलाई शोरूमजवळील लोखंडी टॉवरला मोटार धडकली व मोटार रस्त्याच्या कडेला सुमारे 25 फुट खोल खड्डयात जाऊन पडली. या अपघातात आशुतोष यादव आणि निखिल चौगुले या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी असून एकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

Web Title: Two people died in road accident in search of alcohol at Pune