शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाहानंतरही पोलिसाच्या बाहेर दोन-तीन भानगडी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमविवाहानंतर आणखी दोन ते तीन महिलांशी अनैतिक संबंध ठेवून मारहाण करणाऱ्या पोलीस पतीच्या छळाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्रेमविवाहानंतर आणखी दोन ते तीन महिलांशी अनैतिक संबंध ठेवून मारहाण करणाऱ्या पोलीस पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला. तीन मुले झाल्यानंतरही पतीने वाऱ्यावर सोडल्याची पत्नीची भावना होती. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी खडक पोलिसांनी एका पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस नाईक राजकुमार तात्याबा शिंदे (वय ४२, रा. हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार फलटण, स्वारगेट पोलीस वसाहतीत २००८ ते २१ सप्टेंबर २०२१ दरम्यान घडला.

फिर्यादी व आरोपी राजकुमार शिंदे यांचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही आरोपीचे बाहेरील दोन ते तीन महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचे फिर्यादी यांना समजले. त्याची विचारपूस केल्यावर त्याने फिर्यादीने शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर राजकुमार शिंदे राहत्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य तसेच दोन मुली व लहान मुलगा यांना घेऊन कोठेतरी निघून गेला. फिर्यादी यांना एकटे सोडून दिले. फिर्यादी याने आरोपीला वारंवार फोन केला तरी त्याने उचलला नाही. त्यामुळे मानसिक तणावात फिर्यादी यांनी स्वारगेट पोलीस वसाहतीतील राहत्या घरी २१ सप्टेंबर रोजी घरातील फरशी साफ करण्याचे फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या फिर्यादीवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक म्हस्के तपास करीत आहेत.