शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूचे आणखी दोन बळी

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

स्वाइन फ्लूच्या बळींचे सत्र शहरात वेगाने वाढले असून, शनिवारी आणखी दोघांचा या आजाराने बळी घेतला. यामुळे अवघ्या दीड महिन्यात स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या १४ वर पोहोचली आहे.

पुणे : स्वाइन फ्लूच्या बळींचे सत्र शहरात वेगाने वाढले असून, शनिवारी आणखी दोघांचा या आजाराने बळी घेतला. यामुळे अवघ्या दीड महिन्यात स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या १४ वर पोहोचली आहे. दरम्यान, लागण झालेल्या ६ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर, आज दिवसभरात स्वाइन फ्लूची लागण झालेले १२ नवे रुग्ण सापडले आहेत.मृत्यू झालेल्यांपैकी ४० वर्षीय महिला पिंपरी-चिंचवड येथील केळेवाडी येथे राहणारी होती, तर २४ वर्षीय मुलगा येरवडा येथे राहणारा होता. या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या दोघांचा आज सकाळी मृत्यू झाला. या दोघांनाही स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले होते. दोन दिवसांपूर्वीच दोघांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला होता.दरम्यान, पुण्यात स्वाइन फ्लू झपाट्याने वाढू लागला असून राज्य शासनाच्या आरोग्य विभाग व पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. केवळ जनजागृतीवरच भर दिला जात आहे. त्याचा परिणाम होत नसल्याचे रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून स्पष्ट होत आहे. आज दिवसभरात ९५९ जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४३ संशयितांना टॅमीफ्लू औषधे देण्यात आली. यांपैकी ३१ जणांच्या घशातील कफांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. लागण झालेले २९ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल आहेत. त्यापैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे. उपचारांनी पूर्णपणे बरे झालेल्या ९ जणांना आज रुग्णालयांमधून घरी सोडण्यात आले.स्वाइन फ्लूच्या रुग्णांची शंभरी४आज दिवसभरात स्वाइन फ्लूचे १२ नवे रुग्ण सापडल्याने या वर्षातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांनी शंभरीचा आकडा गाठला. ४दि. १ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०१५ या दिड महिन्याच्या कालावधीत स्वाइन फ्लूचे तब्बल १०० रुग्ण शहरात सापडले आहेत. विशेष म्हणजे गेल्या पूर्ण वर्षभरात स्वाइन फ्लूचे केवळ ३५ रुग्णच सापडले होते.