शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : आणखी दोन बांगलादेशींना एटीएसकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 14:45 IST

गेल्या ५ वर्षांपासून ते बेकायदेशीरपणे पुण्यात वास्तव्य करीत होते. आरोपींनी अवैधरित्या भारतात प्रवेश केला आहे.  

ठळक मुद्दे बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक अधिनियम, बनावट पारपत्राद्वारे भारतात प्रवेश करणे अशा विविध गुन्ह्यांत अटक

पुणे : पुणे दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईतून आणखी दोघा संशयित बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले असून हे दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत राहत असल्याची माहिती मिळाली होती़. यापूर्वी एटीएसने शुक्रवारी पुण्यातील आकुर्डी आणि वानवडी भागातून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती़. 

मुंबईतून ताब्यात घेतलेल्या या दोघांना पुण्यात आणून अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे़. दोघेही अल कायदा या संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय असून बांगलादेशात बंदी घालण्यात आलेल्या अनसरुल्लाह बांगला टीम (एबीटी) या संघटनेच्या सदस्यांच्या ते संपर्कात असल्याची माहिती आहे़. 

मोहम्मद हबीबऊर रेहमान हबीब उर्फ राज जेसुब मंडल (वय ३१, रा. सतानी पुष्काली इर्यानल, जि. खुलना, बांगलादेश, सध्या रा. वानवडी), मोहम्मद रिपन होस्सैन (वय २५, , रा. सतानी पुष्काली इर्यानल, जि. खुलना, बांगलादेश, सध्या रा. आकुर्डी), हनान्न अन्वर हुसेन खान (वय २५, रा. बिराजीकुंदी, थाना पालोंग, जि. शरियतपूर, बांगलादेश, सध्या रा. आकुर्डी) यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे़. न्यायालयाने त्यांना २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ .
 

हबीब हा सेंटरिंग सुपरवायझरचे, तर अन्य दोघे मजुरीचे काम करतात. गेल्या ५ वर्षांपासून ते बेकायदेशीरपणे पुण्यात वास्तव्य करीत होते. बांगलादेशातील अनसरुल्लाह बांगला टीम (एबीटी) या संघटनेच्या सदस्यांच्या ते संपर्कात आहेत. ही संघटना अल कायदाशी संबंधित आहे. त्यामुळे आरोपींचा  दहशतवादी कारवायांशी संबंध आहे का? हे पोलिसांकडून पडताळले जात आहे. 

बांगलादेशातील दहशतवाद्यांना पुण्यात आश्रय दिल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती. तसेच या दहशतवाद्यांसोबत ते मोबाईलवरुन संपर्क साधत असल्याचे समजले होते. संशयित वानवडी आणी आकुर्डी परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसच्या पथकाने त्यानुसार शोध मोहिम राबविली. त्यातील एक जणाला वानवडी येथून ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केल्यावर इतर दोघांचाही आकुर्डी परिसरात माग लागला. त्यांच्या चौकशीमध्ये ते अनधिकृतपणे येथे राहत असल्याचे उघड झाले. त्यांच्याकडे बनावट पॅनकार्ड व आधारकार्ड सापडली. यातील एक आरोपी शहरातील महत्त्वाच्या संरक्षण संस्थेच्या परिसरातच काम करतो. 

आरोपींनी अवैधरित्या भारतात प्रवेश केला असून, बनावट कागदपत्रांचा वापर करुन सिमकार्ड मिळविले आहे. त्या सिमकार्डचा गैरवापर केल्याचे तपासात दिसून येत आहे. आरोपींवर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक अधिनियम, बनावट पारपत्राद्वारे भारतात प्रवेश करणे अशा विविध गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसTerrorismदहशतवाद