शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत ९ बिबटे पकडले

By admin | Updated: June 30, 2015 00:03 IST

निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील कारफाट्याजवळ रविवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सहा वर्षे वयाचा नर बिबट्या जेरबंद करण्यात आला.

निमगाव सावा : निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील कारफाट्याजवळ रविवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सहा वर्षे वयाचा नर बिबट्या जेरबंद करण्यात आला. दोन महिन्यात ९ बिबटे पकडण्यात आले आहेत.येथील कारफाटा परिसरातील मीरा वस्ती परिसरात रज्जाक रहिमान पटेल यांची केळीची बाग आहे. या बागेत आठ दिवसांपूर्वी स्वत: रज्जाक पटेल व अनेक ग्रामस्थांनी नर व मादी बिबट्या, तसेच त्यांचे दोन बछडे पाहिले होते. त्यांनी वनविभागाला कळविल्याने वनविभागाने त्वरित या ठिकाणी पिंजरा लावला होता. आठ दिवसांच्या कालावधीत या बिबट्यांनी या परिसरातील अनेक कुत्री, शेळ्या व कालवडी फस्त केल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. अखेर रविवारी भक्ष्याच्या शोधात निघालेल्या बिबट्याला पिंजऱ्यातील शेळी दिसली. त्याने त्वरित शेळीकडे धाव घेतली आणि क्षणार्धात बिबट्या जेरबंद झाला. वनविभागाचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले व या बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात घेऊन गेले. हा नर जातीचा बिबट्या जरी जेरबंद झाला असला, तरीही या परिसरात अजून एक मादी व दोन बछडे असल्याने ग्रामस्थ भयभीतच आहेत. या वस्तीत सुमारे ५० ते ६० ग्रामस्थ राहत असून, जाण्या-येण्याचा मुख्य रस्ता या केळीच्या बागेजवळूनच जात असल्याने ग्रामस्थांसह शाळकरी मुलेही धास्तावली आहेत. त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)पिंपरगणेत दोन शेळ्या फस्ततळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात आहुपे खोऱ्यातील पिंपरगणे (वाघोबाचीवाडी) येथे बिबट्याने दोन शेळ्या ठार, तर एक जखमी केली आहे.शेतकरी मारुती पारधी यांच्या घरापासून अवघ्या १५ मीटर अंतरावर रात्री १२च्या सुमारास बिबट्याने शेळ्यांवर झडप घातली. भीमाशंकर अभयारण्य परिसरामध्ये यापूर्वी बिबट्याच्या पाऊनखुणा सापडल्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून शेळ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे या अभयारण्यामध्ये बिबट्याच्या वास्तव्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या वर्षी किसन सावळेराम असवले यांच्या शेळ्यांवर झडप घालून पाच वर्षांची शेळी बिबट्याने फस्त केली होती. त्याचप्रमाणे साकेरी गावामध्येही असाच प्रकार घडल्याचे वन विभागामार्फत सांगण्यात आले. वन परिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा केला.