मातीच्या ढिगाऱ्यात अडकून दोन मजुरांचा जागीच मृत्यू; राजगुरूनगर मधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 19:14 IST2023-04-16T19:13:31+5:302023-04-16T19:14:22+5:30
जुन्या पडक्या घराची भिंत पाडत असताना अचानक भिंत मजुरांच्या अंगावर कोसळली

मातीच्या ढिगाऱ्यात अडकून दोन मजुरांचा जागीच मृत्यू; राजगुरूनगर मधील घटना
राजगुरुनगर: राजगुरुनगर शहरातील आझाद चौक येथे पडक्या घराची भिंत कोसळून दोन मजुरांचा जागीच मूत्यू झाल्याची दुदैवी घटना ( दि१६ रोजी घडली. विजय वाडेकर (रा. चांडोली ता खेड ) सुनिल पांचाळ (मुळ गांव लातुर .सध्या रा.खेड ) अशी या घटनेत मुत्यूमुखी पडल्याची नांवे आहेत.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, आझाद चौक येथे स्वप्रील गोडसे यांच्या जुने पडक्या घराची भिंत पाडण्याचे काम विजय वाडेकर व सुनिल पांचाळ या दोन मजुरांनी घेतले होते. संध्याकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास अचानक मातीची भिंत कोसळली. या कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात विजय वाडेकर पुर्ण पणे गाडला गेला. सुनिल पांचाळ यांच्या अंगावर विटा माती, दगड लाकडी तुळया पडल्या. या घटनेची माहिती खेड पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी जाऊन नागरिक व जेसीबीच्या मदतीने मातीचा ढिगारा बाजुला करून विजय वाडेकर यांचा मृतदेह बाहेर काढला. सुनिल पांचाळ यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.