शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

पुणे-सोलापूर महामार्गावर दुचाकीला अपघात, 2 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 16:37 IST

सोलापूर - पुणे महामार्गावर जय भवानी गॅरेजसमोर महामार्गालगत पाईप भरलेला ट्रक उभा होता. 

लोणी काळभोर : पनवेल येथे निघालेल्या टेक्निशियनने आपली दुचाकी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकू नये म्हणून कट मारण्याच्या प्रयत्नात दुचाकी गॅरेजचे शेड लोखंडी खांबाला धडकुन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेही जागीच मृत्युमुखी पडले असल्याची घटना मध्यरात्री घडली आहे.        या अपघातात विनायक अंबरूषी मोरे ( वय ३७, रा. गणेगाव, ता भुम, जि उस्मानाबाद ) व त्यांचा मित्र ईश्वर व्यंकटराव मुंगळे ( वय २५, रा. हलगारा, ता. निलंगा, जि. लातुर दोघेही सध्या रा. युआरसी अपार्टमेंट, लोधीवली, दान फाटयाजवळ, रसायणी, पनवेल, जि. रायगड  ) हे दोघे मृत्युमुखी पडले आहेत. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे हे सध्या सिप्ला कंपनी नवी मुंबई येथे अंन्वेन्टीया हेल्थ केअर लि. कंपनी, अंबरनाथ, ठाणे एमआयडीसीमध्ये टेक्निशियन म्हणून नोकरीस असुन सध्या ते तात्पुरते रसायणी, पनवेल येथे त्यांचे मित्रांसोबत राहण्यास होते. अधुन मधून ते आपले मूळगावी येत जात होते.          रविवारी(दि. २९ ) रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास विनायक मोरे हे त्यांची दुचाकी होंडा शाईन (एमएच ४६ बीएक्स ५२३२) ही वरून त्याचे कंपनीत काम करणारा मित्र ईश्वर मुंगळे हे  गणेगाव येेेथून पनवेल येथे जाणेसाठी निघाले. त्यावेळी मोरे हे दुचाकी चालवत होते. मध्यरात्री ते लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत माळीमळा येथे आले त्यावेळी सोलापूर - पुणे महामार्गावर जय भवानी गॅरेजसमोर महामार्गालगत पाईप भरलेला ट्रक उभा होता. त्याला दुचाकी धडकू नये म्हणून मोरे यांनी तो ट्रक चुकवला व दुचाकी महामार्गाचे खाली घेतली. परंतू दुर्दैवाने दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते गॅरेजचे शेडचे लोखंडी खांबाला उजवीकडुन धडकले व समोर जावून पडले. यामुळे सदरचा खांब वाकला. तर दुचाकी त्या पुढील होर्डींगचे लोखंडी खांबाला धडकून अडकली. त्यामुळे त्यामुळे मोरे व मुंगळे यांचे डोके हात - पाय तसेच शरीरावर गंभीर जखमा झाल्याने ते जागेवरच मयत झाले. पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोन्ही मयत अनोळखी असल्याने एका मयताचे फोन वरून संपर्क साधला. त्यानंतर काही वेळाने मोरे यांचे मावसभाऊ मिलींद विश्वनाथ मोरे ( वय ४७, रा. सर्वे नंबर ३९, देवकर मेडिकलमागे, शिंदे वस्ती, मांजरी रोड, केशवनगर, मुंढवा, पुणे ) हे पोहोचले. ससून रूग्णालयात उत्तरीय तपासणी नंतर दोन्ही मृतदेह त्यांचे ताब्यात देण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलर