श्री विद्याभवन हायस्कूलमध्ये हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:11 IST2021-03-01T04:11:05+5:302021-03-01T04:11:05+5:30

श्री विद्याभवन शाळेमध्ये सर्व पालकांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम विजेत्याला पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. ...

Turmeric-kumkum ceremony at Shri Vidya Bhavana High School | श्री विद्याभवन हायस्कूलमध्ये हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

श्री विद्याभवन हायस्कूलमध्ये हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

श्री विद्याभवन शाळेमध्ये सर्व पालकांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या स्पर्धेमध्ये प्रथम विजेत्याला पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. तेव्हा दुर्गा केनी यांनी ही पैठणी मिळवण्याचा मान पटकावला. तर द्वितीय क्रमांक ज्योती जोशी, तृतीय क्रमांक कल्पना नाईक यांना मिळाला. महिलांनी घरासोबतच आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे म्हणून त्यांच्यासाठी खास खेळाचे आयोजन केले होते. खेळाच्या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सन्माननीय कल्पना घुले पाटील यांनी सर्व उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी स्वाती ढमाले, सुवर्णा ढमाले, स्वाती भेगडे, वैशाली सातव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळेच्या संस्थापिका तथा प्राचार्या सुचित्रा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन झाले.

--------------------------

फोटो ओळ : श्री विद्याभवन हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात उपस्थित महिला.

Web Title: Turmeric-kumkum ceremony at Shri Vidya Bhavana High School