शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोग्यांची फरफट

By admin | Updated: August 5, 2015 03:11 IST

क्षयरोग्यांसाठी असलेल्या औंध उरो रुग्णालयातील रुग्णांना इतर आजारांवरील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे.

राहुल कलाल , पुणे क्षयरोग्यांसाठी असलेल्या औंध उरो रुग्णालयातील रुग्णांना इतर आजारांवरील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्यामुळे क्षयरोग्यांची उपचारासाठी फरफट होत आहे. आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णांना तातडीने आणि चांगले उपचार देत बरे करणे, हा उद्देश घेऊन स्थापन झालेल्या शासकीय रुग्णालयांनी या उद्देशालाच हरताळ फासल्याचा हा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.राज्य शासनाच्या वतीने औंध येथे काही एकर परिसरात क्षयरोग्यांवर उपचारासाठी उरो रुग्णालय आणि इतर आजारांवरील उपचारासाठी जिल्हा रुग्णालये कार्यरत आहेत. उरो रुग्णालयात फक्त क्षयरोग झालेल्या रुग्णांनाच प्रवेश दिला जातो आणि या आजारावरच उपचार केले जातात. क्षयरोगावरील उपचार अर्धवट सोडल्यामुळे अनेक रुग्ण क्षयाच्या औषधांना जुमेनासे होतात. अशा एमडीआर रुग्णांवरही उरो रुग्णालयात उपचार केले जातात. या रुग्णांना अनेकदा इतर आजारही होतात. मात्र, त्यावर उपचारासाठी सोय उरो रुग्णालयात नाही. त्यामुळे या रुग्णांना शेजारीच असलेल्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येते. जिल्हा रुग्णालयातील विविध आजारांवरील डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून औषधोपचार केले जातात. मात्र, आता जिल्हा रुग्णालय प्रशासनाने या रुग्णांवर उपचारास नकार दिला आहे.या संदर्भातील पत्र जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय देशमुख यांनी ३० जुलैला उरो रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. एन. जी. ढवळे यांना पाठविले आहे. त्यात सांगितले आहे की, उरो रुग्णालयातील टीबीचे रुग्ण औषधे घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात येतात. पण हे रुग्ण मास्क लावून येत नाहीत आणि त्यांच्यासोबत शिपाईही नसतात. त्यामुळे रुग्णालयातील इतरांना टीबी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात टीबीच्या रुग्णांना औषधे देण्यात येणार नाहीत. या संदर्भात अनेकदा सांगूनही रुग्ण आमच्याकडे का पाठविले जातात? तरी रुग्णांना येथून पुढे औषधांकरिता रुग्णालयात पाठविण्यात येऊ नये.जिल्हा रुग्णालयाने हा निर्णय घेतल्यामुळे उरो रुग्णालयासमोर पेच निर्माण झाला आहे. आता इतर आजारांसाठी क्षयरोग्यांना कोठे पाठवायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.क्षयरोगावरील उपचार अर्धवट सोडल्यामुळे अनेक रुग्ण क्षयाच्या औषधांना जुमेनासे होतात. अशा एमडीआर रुग्णांवरही उरो रुग्णालयात उपचार केले जातात. या रुग्णांना अनेकदा इतर आजारही होतात. मात्र, त्यावर उपचारासाठी सोय उरो रुग्णालयात नाही. त्यामुळे या रुग्णांना शेजारीच असलेल्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येते. उरो रुग्णालयातील टीबीचे रुग्ण औषधे घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात येतात. पण हे रुग्ण मास्क लावून येत नाहीत आणि त्यांच्यासोबत शिपाईही नसतात. त्यामुळे रुग्णालयातील इतरांना टीबी होण्याची शक्यता आहे. रुग्ण मास्क न लावता येतातउरो रुग्णालयातील एमडीआर टीबीचे रुग्ण जिल्हा रुग्णालयात इतर उपचारासाठी येतात. पण ते मास्क लावून येत नाहीत. त्यामुळे हा आजार पसरण्याची भीती आहे. रुग्णांसोबत उरो रुग्णालयाकडून एकही शिपाई पाठविला जात नाही. या संदर्भात आम्ही पत्र पाठविले आहे. रुग्णालयात रुग्ण आल्यानंतर त्याची तपासणी करून लगेचच रुग्णालयात पाठविण्यात येते. त्यानंतर औषधे पाठविण्यात येतात.- डॉ. संजय देशमुख,शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय औंधआमच्याकडे फक्त क्षयरोगावर उपचार उरो रुग्णालयात केवळ क्षयरोगावर उपचार केले जातात. आमच्याकडे एमडीआर टीबीचे रुग्णही असतात. त्यांना इतर आजार झाल्यास उपचारासाठी, डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्यासाठी इतर रुग्णालयात पाठविण्यात येते. आमच्या शेजारीच शासनाचे जिल्हा रुग्णालय असल्याने  आम्ही अशा रुग्णांना तेथे पाठवितो. पण आता जिल्हा रुग्णालयाकडून पत्र आले आहे की, क्षयरोग्यांना तेथे पाठवू नये. मुळातच आम्ही रुग्णालयात दाखल  होणाऱ्या सर्व क्षयरोग्यांना, त्यांच्या नातेवाइकांना आणि डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मास्क घातल्याशिवाय राहूच देत नाही. तर मग कोणताही टीबीचा रुग्ण मास्क न लावता कसा काय जिल्हा रुग्णालयात जाऊ शकतो. आता रुग्णांना इतर उपचारासाठी कोठे पाठवायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.- डॉ. एन. जी. ढवळे, अधीक्षक, उरो रुग्णालय, औंध