ट्रकची दुचाकींना धडक ; तरुण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 15:45 IST2018-12-01T15:37:13+5:302018-12-01T15:45:10+5:30

कात्रज येथील दत्तनगर भागात एका भरधाव ट्रकने दाेन दुचाकींना धडक दिली अाहे. यात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे.

truck hits two wheeler ; one seriously injured | ट्रकची दुचाकींना धडक ; तरुण गंभीर जखमी

ट्रकची दुचाकींना धडक ; तरुण गंभीर जखमी

पुणे : कात्रज येथील दत्तनगर भागात एका भरधाव ट्रकने दाेन दुचाकींना धडक दिली अाहे. यात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे. ही घटना दुपारी पाऊने तीनच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला अाहे. 


    प्रत्यक्षदर्शी असलेल्या अग्निशमन दलाचे कर्मचारी याेगेश चव्हाण यांनी सांगितले की ते काम संपवून घरी चाललेले असताना त्यांच्यासमाेर एका भरधाव ट्रकने अॅक्टिव्हावरील तरुणीला अाणि एका दुचाकीवरील तरुणाला धडक दिली. धडक बसल्याने तरुणी उडून बाजूला पडली तर दुचाकीवरील तरुण ट्रकच्या मधल्या भागात जाऊन अडकला. ताे जबर जखमी झाला अाहे. एका मातीच्या ढिगाऱ्याला धडकून ट्रक थांबला. ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत अाहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला. चव्हाण अाणि इतर नागरिकांनी जखमी तरुणाला पाेलिसांच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केले. काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार ट्रकचालकाने रस्त्यात एका बसला अाणि चारचाकीला सुद्धा धडक दिली हाेती.

 
    दरम्यान पाेलीस अधिक तपास करीत अाहेत. 

Web Title: truck hits two wheeler ; one seriously injured