रांजणगाव गणपती : जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे (ता. शिरूर) परिसरात आईसह दोन निष्पाप बालकांना पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी पुणे-अहिल्यानगर महामार्गालगत खंडाळा माथ्याजवळ रांजणगाव गावच्या हद्दीत एक महिला व तिच्या दोन लहान मुलांना अज्ञात इसमाने खून करून पेटवून दिले. या महिलेचे वय अंदाजे २५ वर्षे असून, लहान मुलांचे वय अंदाजे चार वर्षे व दीड वर्षे आहे. ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस हे मृतदेह आढळले.
ओळख पटेना
हे हत्याकांड कोणी, कोणत्या कारणावरून केले, हे स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासणीत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असे गोंदलेले असल्याचे पोलिसांना आढळले आहे. या तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळी मिळालेले पुरावे, सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपशील तपासण्यात येत आहेत.