निगडी-रावेत मार्गावर उद्या ट्रिंग-ट्रिंग डे

By Admin | Updated: April 4, 2015 05:55 IST2015-04-04T05:55:38+5:302015-04-04T05:55:38+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका (पीसीएमसी) आणि जनवाणीतर्फे सायकल चालविण्याला प्रोत्साहन देणारा ट्रिंग-ट्रिंग डे ५ एप्रिलला साजरा होणार आहे.

Triangle-Triangle Day on Nigdi-Ravet Road | निगडी-रावेत मार्गावर उद्या ट्रिंग-ट्रिंग डे

निगडी-रावेत मार्गावर उद्या ट्रिंग-ट्रिंग डे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका (पीसीएमसी) आणि जनवाणीतर्फे सायकल चालविण्याला प्रोत्साहन देणारा ट्रिंग-ट्रिंग डे ५ एप्रिलला साजरा होणार आहे. सकाळी ६.३० ते ९.३० या वेळात हा उपक्रम संभाजी चौक, निगडी प्राधिकरण ते भोंडवे चौक, रावेत या मार्गावर होणार आहे.
प्रदूषणापासून मुक्ती आणि सार्वजनिक वाहतुकीचा शक्य तितका वापर करण्याचे आवाहन, या हेतूने हा वैशिष्ट्यपूर्ण सायकल डे अर्थात ट्रिंग ट्रिंग डे ही कल्पना ३० नोव्हेंबरला प्रथम भोसरीमध्ये राबविली. त्यानंतर ४ जानेवारीला पिंपळे सौदागर येथे, तिसरा ट्रिंग ट्रिंग डे नवी सांगवीत झाला. चौथा ट्रिंग-ट्रिंग डे प्राधिकरणात होणार आहे.
याविषयी आयुक्त राजीव जाधव म्हणाले, ‘‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा नागरिकांनी पुरेपूर वापर करावा आणि निदान छोट्या अंतरासाठी शक्य तेव्हा सायकल चालवावी, हा यामागचा मुख्य हेतू आहे. या दिवसाच्या निमित्ताने अधिकाधिक नागरिक सायकल घेऊन रस्त्यावर येऊन ट्रिंग ट्रिंग डेमध्ये सहभागी होत आहेत. यानिमित्ताने पुन्हा सायकल कल्चर येऊन आरोग्यदायी वातावरण होईल.’’(प्रतिनिधी)

Web Title: Triangle-Triangle Day on Nigdi-Ravet Road