शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलीस मुजोर

By admin | Updated: October 7, 2015 04:20 IST

नियोजनात मागे आणि कारवाईत तत्पर, अशी परिस्थिती चिंचवड वाहतूक शाखेची ओळख बनली आहे. तोंडपाठ असणाऱ्या नियमांचे पाढे वाचत वाहनचालकांना वेठीस धरून

- पराग कुंकूलोळ, चिंचवड नियोजनात मागे आणि कारवाईत तत्पर, अशी परिस्थिती चिंचवड वाहतूक शाखेची ओळख बनली आहे. तोंडपाठ असणाऱ्या नियमांचे पाढे वाचत वाहनचालकांना वेठीस धरून पैसे उकळण्याचा धंदा राजरोसपणे सुरू आहे. वाहतूक शाखेच्या या अजब कारभाराबाबत नागरिक संतप्त झाले आहेत. नियमांचे उलंघन करणाऱ्या वाहनचालकांना हजार, बाराशे रुपयांची दंडात्मक पावती करावी लागेल, असा सज्जड दम भरला जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी वेळ न देता रस्त्याच्या कडेला उभे राहून वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी पोलीस कर्मचारी नेहमीच तत्पर असतात. चिंचवडमधील चापेकर चौक, अहिंसा चौक, जुना जकात नाका परिसर, (कै.) शहीद अशोक कामठे स्थानक परिसर, महावीर चौक, पुणे-मुंबई महामार्गाचा परिसर हा अत्यंत रहदारीचा आहे. या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कर्मचारी नियमित असणे गरजेचे आहे.वाहन परवाना, कागदपत्रे, पीयूसी, हेल्मेट अशा स्वरूपाची तपासणी करण्यासाठी हे कर्मचारी व्यस्त असतात. मात्र, वाहन कायदा काय सांगतो, याचा परिपूर्ण अभ्यास असल्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने वाहनचालकांची दंडाचे मोठे आकडे सांगून अडवणूक केली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.नो पार्किंगमधून उचलण्यात आलेली वाहने सोडविण्यासाठीही वाहनचालकांची लूट सुरूच आहे. उचलून आणलेली वाहने सोडविण्यासाठी आलेल्या वाहनचालकांना दंडाची पावती न देता मनमानी पद्धतीने पैसे घेत असल्याच्या तक्रारी वाहनचालक करत आहेत. हे पैसे घेण्यासाठी पोलीस कर्मचारी समोर येत नाहीत. वाहन उचलण्यासाठी कार्यरत असणारी मंडळी वाहनचालकांकडून पैसे वसूल करतात. वाहतूक शाखेच्या या प्रकाराबाबत नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी महिलांशी उद्धट वर्तणूक करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. शनिवारी दुपारी अहिंसा चौकात चिंचवड स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक वाहने अडविण्याचे काम सुरु होते. तानाजीनगरमधील एका महिलेला सिग्नल तोडल्याच्या कारणावरून अडविण्यात आले. त्या महिलेला बाराशे रुपयांचा दंड सांगितला. परंतु, इतके पैसे नसल्याने त्यांनी सहाशे रुपये असल्याचे सांगत दंडाची पावती मागितली. परंतु दंडाची पावती न देताच त्यांना जावे लागले. त्यांनी लोकमत प्रतिनिधीकडे व्यथा मांडल्या.रस्त्याच्या कडेला उभे राहून वाहनचालकांची तपासणी करण्याकडेच अधिक लक्ष दिले जाते. पुणे-मुंबई महामार्गावरील अवैध वाहतूक खुले आम सुरू असूनही, या ठिकाणी कारवाई करण्यास कर्मचारी धजावत नाहीत. आर्थिक हितसंबंधामुळे चिंचवड परिसरात अवैध वाहतूक सुड़ऊ असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अशा प्रकाराबाबत शांतता का, असा सवाल केला जात आहे. व्यावसायिक वाहने मुख्य रस्त्यावर उभी असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही, ही आश्चर्याची बाब आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.त्या कर्मचाऱ्यांची नावे कळवावाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंडात्मक कारवाई करून दंडाची पावती देणे बंधनकारक आहे. अशा सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. नो पार्किंगमधील वाहने उचलल्यानंतर दंडाची पावती देणेही बंधनकारक आहे. मनमानी काम करणाऱ्या पोलिसांची नावे आमच्याकडे द्यावीत अथवा अशा कारभाराबाबत तक्रार अर्ज करावा.- महेंद्र रोकडे, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभागवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून किती दंड आहे. याची सर्व सामान्य नागरिकाला माहिती नसल्याने अडचणी येतात निगडी व चिंचवड मधे नो पार्किंगमधील वाहने सोडविताना अडवणूक होते. दंडाची पावती न देताच पैसे उकळले जातात. चिंचवडमधील वाहतूक पोलीस कर्मचारी वाहंचालकांशी अरेरावीची भाषा करतात. विशेषत: महिलांशी कसे बोलावे, याचे भान नाही. कामाचा खुप अनुभव आहे, तुमच्यासारखे लोक रोज भेटतात, असे म्हणत असभ्य वागणूक दिली जाते. - एस. बी. राणे, चिंचवड