शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १५१ अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: July 10, 2015 02:14 IST

महापालिकेत नियुक्ती एकीकडे, तर काम दुसरीकडे अशापद्धतीने वर्षानुवर्षे बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत या विभागांमध्ये ठाण मांडून बसलेल्या १५१ अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत बदली करण्यात आली आहे.

पुणे : महापालिकेत नियुक्ती एकीकडे, तर काम दुसरीकडे अशापद्धतीने वर्षानुवर्षे बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत या विभागांमध्ये ठाण मांडून बसलेल्या १५१ अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या ठिकाणी संबंधित अधिकारी हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने बदलीच्या आदेशामध्ये दिला आहे.शासनाच्या सेवा नियमावलीनुसार महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची दर ३ वर्षांनी बदली होणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे हितसंबंध तयार होऊ नयेत याकरिता हा दंडक घालून देण्यात आला आहे. मात्र,पुणे महापालिकेमध्ये या नियमाला धाब्यावर बसवून अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करीत होते. बदली झाल्यानंतरही ते त्याच विभागात कार्यरत राहत होते. स्वयंसेवी संस्थांनी याबाबत आवाज उठविला होता, नगरसेवकांनीही मुख्य सभेमध्ये या विषयावरून प्रशासनाला धारेवर धरले होते. त्या वेळी नियमित बदल्यांच्यावेळी या अधिकाऱ्यांची बदली केली जाईल, असे आश्वासन आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी १५१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.बांधकाम विभागातील ३८, पाणीपुरवठा विभागातील २९ अधिकाऱ्यांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे. या दोन विभागांतून अधिकारी बदलीच होऊ देत नव्हते. बदली झाली तरी विभागप्रमुखांच्या आशीर्वादाने ते पुन्हा त्याच विभागात कार्यरत राहत होते. विभागप्रमुखांनी कार्यमुक्त न केल्याने अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रत्यक्षात येऊ शकलेल्या नव्हत्या. यंदा मात्र बदली झालेल्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. साहेबराव दांडगे, श्रीकांत वायंदडे, राजेंद्र वायकर यांची बांधकाम विभागातून पाणीपुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे. मिलिंद बापट यांची बांधकाम विभागातून भवन रचना विभागात, राजेंद्र थोरात पाणीपुरवठा विभागातून बांधकाम विभागात, जयंत वाघ यांची भवन रचना विभागातून उद्यान विभागात, जयंत पवार यांची बांधकाम विभागातून उद्यान विभागात, सुरेश साळवे यांची पथ विभागातून ड्रेनेज विभागात, अजयकुमार वायसे यांची पाणीपुरवठा मधून बांधकाम, धनंजय जाधव, सुधीर कदम यांची बांधकाम विभागातून क्षेत्रीय कार्यालयामध्ये बदली करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाईबदली झालेल्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी रूजू झाल्याचा अहवाल विभागप्रमुखांनी अतिरिक्त आयुक्तांकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. बदली रद्द करण्यासाठी राजकीय किंवा इतर दबाब आणल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे स्पष्टपणे आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.