एसीपी सुनील तांबे यांची विशेष शाखेत बदली; ललित पाटील, कुरकुंब ड्रग्ज प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 12:59 IST2024-07-10T12:58:36+5:302024-07-10T12:59:24+5:30

गतवर्षी दि. ३ जुलै रोजी तांबे यांनी गुन्हे शाखा १ च्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली होती

Transfer of ACP Sunil Tambe to Special Branch Lalit Patil played an important role in the Kurkumb drug case | एसीपी सुनील तांबे यांची विशेष शाखेत बदली; ललित पाटील, कुरकुंब ड्रग्ज प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली

एसीपी सुनील तांबे यांची विशेष शाखेत बदली; ललित पाटील, कुरकुंब ड्रग्ज प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली

पुणे : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, शरद मोहोळ हत्या प्रकरण, कुरकुंब ड्रग्ज प्रकरण, बहुचर्चित पोर्शे अपघात प्रकरणामध्ये तपास अधिकारी म्हणून महत्वाची भूमिका बजावणारे  गुन्हे शाखा १ चे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांची विशेष शाखा इथे बदली करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. 
    
तांबे यांच्या पोलीस आयुक्तालयांतर्गत बदलीचे आदेश देण्यात आले आहे. गुन्हे शाखा १ पदी सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गतवर्षी दि. ३ जुलै रोजी तांबे यांनी गुन्हे शाखा १ च्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली होती.  पुढच्या काही महिन्यात तांबे हे सेवानिवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी त्यांची बदली गुन्हे शाखेवरून विशेष शाखेत करण्यात आल्याने पोलीस दलातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Transfer of ACP Sunil Tambe to Special Branch Lalit Patil played an important role in the Kurkumb drug case