शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

साथ जियेंगे..! एचआयव्ही बाधित तरुण तरुणी अडकले विवाह बंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 18:28 IST

अनेक बाधित लोक एकटे पडतात आणि खचून जातात तरीही जोडीदाराच्या रूपाने आशेचा किरण मिळाल्यास ते आनंदी जीवन जगू शकतात

पांडुरंग मरगजे

धनकवडी : पॉझिटिव्ह रुग्णांबाबत आपल्या समाजात अजूनही अनेक गैरसमज आहेत. बऱ्याचदा कोणतीही चूक नसताना काहींना या जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागते. त्यापेक्षा समाजात वावरताना मिळणारी वागणूक फार त्रासदायक होते. त्यामुळे अनेक बाधित लोक एकटे पडतात आणि खचून जातात तरीही जोडीदाराच्या रूपाने आशेचा किरण मिळाल्यास ते आनंदी जीवन जगू शकतात. त्यासाठी ममता फौंडेशनमध्ये नुकताच एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. ‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’ म्हणत एचआयव्ही बाधित तरुण-तरुणी लग्नबंधनात अडकले.

गुजरवाडी येथील ममता फौंडेशन एड्सबाधितांचं आश्रयस्थान असून एचआयव्ही संक्रमित आईमुळे मुलांनाही एचआयव्हीची लागण झालेली असते. अशा मुलांच्या संगोपनाचा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला असतो. अशाच मुलांचे संगोपन करण्यासाठी डॉ. शिल्पा व अमर बुडूख दाम्पत्यांनी २००८ मध्ये ममता फौंडेशनची स्थापना केली. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक जिल्हा आणि गावातून लहान मुले दाखल झाली. योग्य औषधोपचार, उत्तम वातावरण आणि सकस आहार, व्यायाम याद्वारे या मुलांची मानसिक आणि शारीरिक शक्ती वाढवण्याचं काम या ठिकाणी होत असतं. 

ममतामधील या अनोख्या विवाह सोहळ्यात कधी काळी एक एचआयव्ही संक्रमित असलेलं लहान मूल आणि मुलगी दाखल झाली, नुकतंच त्याच लग्न झालं तसेच त्याच्या बरोबर अजून एक जोडप्यांचा ही विवाह झाला. या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. हळद, मेंहदी, बँडने वातावरण प्रसन्न झाले होते. विवाह सोहळ्यास माजी नगरसेवक प्रकाश कदम, अभिनेत्री तेजस्विनी पंडित, अभिनेता जगन्नाथ निवंगुणे, माजी सरपंच दीपक गुजर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, संगीता यादव, शरद सोनवणे, प्रताप निकम, आरोग्य निरीक्षक प्रमोद ढसाळ, ॲड. दिलीप जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक उपक्रमासाठी अनेक जण एकत्र आलं तर काय होतं त्याचं हे उदाहरण आहे, असे मत ममता फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. शिल्पा बुडूख यांनी व्यक्त केले. ममता फौंडेशन एचआयव्ही बाधितांना आशेचा किरण असून संस्थेतून एचआयव्ही बाधित मुलांना नवे जीवन मिळत असते. औषधोपचारासोबतच संस्थेत मुलांना व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाते. त्यामुळे ही मुले स्वत:च्या पायावर उभी राहतात. त्यामुळे आता एचआयव्हीबाधितांच्या लग्नासाठी जास्तीत जास्त प्रयत्न व्हायला हवेत.

वैद्यकशास्त्रातील संशोधनामुळे एचआयव्ही संक्रमित आई-वडिलांची मुले संक्रमित होत नाहीत. त्यासाठी एचआयव्ही बाधितांना आनंदी जीवनासाठी आशेचा किरण मिळावा म्हणून प्रयत्न केले जातात. - शिल्पा बुडूख

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नHIV-AIDSएड्सLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टHealthआरोग्यSocialसामाजिक