शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय; जुन्नर तालुक्यातील महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 11:16 IST

जुन्नर तालुक्यात बाराशे फूट खोल दरीत ४० वर्षीय पुरुष व एका युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती

जुन्नर: तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या दुर्गवाडीच्या कोकणकड्याखालील सुमारे बाराशे फूट खोल दरीत ४० वर्षीय पुरुष व एका युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. जुन्नरपोलिस व शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मुसळधार पावसात व जोरदार वाऱ्यात प्रतिकूल परिस्थितीवर मृतदेह बाहेर काढले. हा प्रकार आत्महत्येचा असल्याचा तसेच ते एकमेकांचे नातेवाईक असल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत व बेपत्ता असलेले रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०) आणि दुर्गवाडी जवळील आंबोली (ता. जुन्नर) येथून बेपत्ता असलेली अल्पवयीन महाविद्यालयीन युवती रूपाली संतोष खुटाण या दोघांचे हे मृतदेह असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. जुन्नरचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी ही माहिती दिली.

मृत तलाठी पारधी हे दुर्गवाडी येथील मूळ रहिवासी असून कामानिमित्त श्रीगोंदा येथे वास्तव्यास होते. पारधी हे काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने अहिल्यानगर येथील तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल केली होती. तर मृत युवती रूपाली ही देखील बेपत्ता असल्याची तक्रार दि १५ मे रोजी जुन्नर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. तिचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण झाल्याचा संशय तिचे नातेवाईक व्यक्त करत होते.                         दरम्यान, दुर्गवाडी येथे घाटमाथ्यावरील कोकण कड्यावरून घाटाखाली कोसळणाऱ्या उरफाट्या धबधब्यापासून काही अंतरावर एक पांढऱ्या रंगाची नवीन चारचाकी काही दिवसांपासून बेवारस उभी असल्याचे तेथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. तसेच कोकणकड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला सापडल्या. यावरून कोणीतरी कड्यावरून पडले असावे वा आत्महत्या केली असावी, असा संशय ग्रामस्थांना आला. पोलिस तसेच शिवजन्मभूमी रेस्क्यू पथकाच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी शोध घेतला असता कड्याखाली रूपालीचा मृतदेह आढळून आला, तर त्यापासून काही अंतरावर मृत तलाठ्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान या मृतदेहाच्या कपड्यामध्ये सापडलेल्या चिठ्ठीमध्ये आपण नातेवाइकांच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. सदर चिट्ठी या दोघांनीही दि. १४ रोजी लिहिली होती. या प्रकरणी अधिकचा तपास जुन्नर पोलिस करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरDeathमृत्यूriverनदीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी