झटापट करून तिघांनी तरुणीकडून लुटले १७ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 08:03 PM2021-03-27T20:03:04+5:302021-03-27T20:03:42+5:30

पहाटेच्या सुमारास घडला हा प्रकार

Three of them looted Rs 17,000 from the girl | झटापट करून तिघांनी तरुणीकडून लुटले १७ हजार

झटापट करून तिघांनी तरुणीकडून लुटले १७ हजार

Next
ठळक मुद्देएकूण १७ हजार रुपये किमतीचा ऐवज नेला लुटून

पिंपरी : दुचाकीस्वार तरुणींना अडवून त्यांच्याशी झटपट करीत १७ हजारांचा ऐवज लुटून नेला. दुचाकीवरील तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दापोडी येथे गुरुवारी (दि. २५) पहाटे जबरी चोरीचा हा प्रकार घडला.
ललरी नकीमा ललरीन मोईया रालते (वय २९, रा. जुनी सांगवी) यांनी शुक्रवारी (दि. २६) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी ललरी या मैत्रिणीसोबत गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दापोडी येथून दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळेस दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांची दुचाकी फिर्यादीच्या दुचाकीला आडवी घातली. त्यानंतर त्यांनी झटापट करत फिर्यादी यांच्या मैत्रिणीचा १६ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि एक हजार रुपये असलेली लेझरची पर्स असा एकूण १७ हजार रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला.

Web Title: Three of them looted Rs 17,000 from the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.