Sonia Gandhi : सोनिया गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा, खरगे यांचा प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 07:51 PM2024-06-08T19:51:51+5:302024-06-08T19:55:03+5:30

Sonia Gandhi : काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसची कामगिरी मागील निवडणुकीपेक्षा चांगली राहिली आहे.

Sonia Gandhi Congress Parliamentary Party President, Kharge approved the proposal | Sonia Gandhi : सोनिया गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा, खरगे यांचा प्रस्ताव मंजूर

Sonia Gandhi : सोनिया गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा, खरगे यांचा प्रस्ताव मंजूर

Sonia Gandhi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे, एनडीए'ला बहुमत मिळाले आहे. काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीत चांगल्या जागा मिळाल्या आहेत. या निकालाने काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. पक्षाच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत नवा उत्साह पाहायला मिळत आहे. आज काँग्रेसकडून सातत्याने बैठका सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. शनिवारी ८ जून रोजी सायंकाळी लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही पक्षांच्या खासदारांच्या बैठकीत त्यांची पुन्हा नेतेपदी निवड करण्यात आली.

मोदी ३.० सरकारच्या कॅबिनेटचा फॉर्म्युला ठरला; महाराष्ट्रातून कुणाला मिळणार संधी?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी यांची संसदीय पक्षाच्या प्रमुखपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. याला सर्व खासदारांनी एकमताने मंजुरी दिली. या आधी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा ठराव मंजूर केला.

वीरप्पा मोईली म्हणाले, "आम्हाला बऱ्याच गोष्टींवर चर्चा करण्याची गरज आहे - ज्या प्रकारे काँग्रेस आणि I.N.D.I.A. ला खूप जास्त मतांची टक्केवारी आणि जागा मिळाल्या. अर्थात, आम्ही जिंकून सत्तेत यायला हवे होते. राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान व्हायला हवे होते, पण आता नरेंद्र मोदी इतके महान नाहीत, ते मताच्या बाबतीत पूर्णपणे खाली पडले आहेत आणि आज नाही तर उद्या काँग्रेसची सत्ता येईलच, असंही मोईली म्हणाले. 

एनडीए सरकारमध्ये महाराष्ट्रातून कुणाला मिळणार संधी?

येत्या ९ जूनला सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला जगभरातील पाहुण्यांसह ९००० जण उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी पंतप्रधान आणि काही कॅबिनेट मंत्री शपथ घेतील. या सोहळ्यासाठी बांग्लादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशससह अन्य देशातील नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. मोदी तिसऱ्यांदा शपथ घेण्यापूर्वी त्यांच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

त्यातच मंत्रिमंडळात समाविष्ट केल्या जाणाऱ्या नेत्यांची संभाव्य यादी समोर आली आहे. त्यानुसार, यात काही माजी मंत्री आणि नव्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. घटक पक्षातील टीडीपी, जेडीयू, आरएलडी, शिवसेना, राष्ट्रवादी, अपना दल, एलजेपी पक्षातील नेत्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात यंदा भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे घटक पक्षांना सोबत घेत भाजपाला सरकार चालवावं लागणार आहे. एनडीएत कोणाला कोणती खाती देणार याबाबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या घरी बैठकही पार पडली आहे. 

Web Title: Sonia Gandhi Congress Parliamentary Party President, Kharge approved the proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.