पंकजाताई निवडून नाही आल्या तर...; व्हायरल व्हिडिओतील युवकाचा मृतदेह आढळला 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 08:12 PM2024-06-08T20:12:30+5:302024-06-08T20:13:37+5:30

किनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी नोंद करण्यात आली आहे.

If Pankajatai is not elected The body of the youth in the viral video was found  | पंकजाताई निवडून नाही आल्या तर...; व्हायरल व्हिडिओतील युवकाचा मृतदेह आढळला 

पंकजाताई निवडून नाही आल्या तर...; व्हायरल व्हिडिओतील युवकाचा मृतदेह आढळला 

राजकुमार जोंधळे / किनगाव (जि. लातूर) : ‘पंकजाताई निवडून नाही आल्या तर सचिन गेला...’ असा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या ट्रकचालक सचिन मुंडे (३८, रा. येस्तार, ता. अहमदपूर) यांचा शुक्रवारी रात्री उशिरा मृतदेह आढळून आल्याची घटना अहमदपूर-अंधोरी रोडवरील बोरगाव पाटीनजीक घडली. याबाबत किनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी नोंद करण्यात आली आहे.

पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील येस्तार येथील शेतकरी कुटुंबातील अविवाहित युवक सचिन कोंडीबा मुंडे हा व्यवसायाने ट्रकचालक हाेता. ट्रकचालक असलेला सचिन आई-वडील आणि भावाचा उदरनिर्वाह चालवीत हाेता. त्याने काही दिवसांपूर्वी ‘पंकजाताई नाही जर आल्या... तर सचिन गेला...’ असा व्हिडिओ व्हायरल केला हाेता. दरम्यान, त्याचा मृतदेह बाेरगाव पाटीनजीक शुक्रवारी रात्री आढळून आला आहे. 

पाेलिस म्हणतात, चालकाने बोरगाव पाटीवर प्रवासी चढ-उतार करण्यासाठी अहमदपूर आगाराची यलदरवाडी मुक्कामी बस (एमएच १३ सीयू ७९२९) शुक्रवारी रात्री नऊ वाजता थांबवली होती. दरम्यान, चालकाने प्रवासी चढल्यानंतर बस पाठीमागे घेतली असता, पाठीमागे थांबलेल्या सचिनला बसचा जाेराचा धक्का लागला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. सचिनच्या मृतदेहावर येस्तार येथे शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत किनगाव पाेलिस ठाण्यात मृत सचिनचे काका संग्राम वैजनाथ मुंडे यांनी दिलेल्या माहितीवरून बसचालकाविरोधात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो.उपनि. रामचंद्र गोखरे हे करीत आहेत.

सचिनचा व्हिडिओ सर्वत्र झाला व्हायरल...

‘पंकजाताई नाही जर आल्या... तर सचिन गेला...’ असा सचिन मुंडे यांचा व्हिडिओ अहमदपूर तालुक्यातील सर्व व्हाॅटस्ॲप ग्रुप आणि साेशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या अनुषंगानेही पाेलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: If Pankajatai is not elected The body of the youth in the viral video was found 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.