शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

जबरी चोरी करणारे तीन जण जेरबंद

By admin | Updated: February 19, 2017 04:29 IST

पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जबरी चोरी करणाऱ्या तिघांना जेरबंद केले आहे. त्यांनी २ जबरी चोऱ्या व १ दुचाकीची चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.

जेजुरी : पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जबरी चोरी करणाऱ्या तिघांना जेरबंद केले आहे. त्यांनी २ जबरी चोऱ्या व १ दुचाकीची चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी नीलेश पांडुरंग धोत्रे नितीन मच्छिंद्र माने (दोघेही रा. शिरूर, सिद्धार्थनगर) व रोहिदास सूर्यकांत गुंजाळ (रा. शिरूर रामलिंग) या तिघांना जेरबंद केले आहे. या तिघांनी २८ जानेवारी रोजी रात्री जेजुरी पोलीस ठाणे हद्दीत सासवड-यवत रोड येथे पिक-अपचालक सतीश तात्याबा थोरात (वय ३४, रा. खुटबाव, ता. दौंड) यांना मारहाण केली होती. त्यांच्याकडील रोख ३ हजार रुपये व मोबाइल असा ६ हजार ५० रुपये किमतीचा माल जबरीने लुटला होता. जिल्ह्यातील व पर-जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली असता नगर जिल्ह्यात जुून २०१५ मध्ये नीलेश धोत्रे व नितीन माने (दोघे रा. शिरूर) यांनी पिक-अपचालकास लुटल्याच्या गुन्ह्यात ते सध्या जेलमधून जामिनावर सुटल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने त्यांची माहिती काढली असता नीलेश धोत्रे, नितीन माने, रोहिदास गुंजाळ यांच्याकडे नंबर नसलेली बजाज पल्सर २२० गाड्या असून ते वाहनचालकांना रस्त्यात अडवून लूटमार करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांच्यावर पाळत ठेवून तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर २२० ही ओतूर (ता. जुन्नर) येथून चोरल्याचे सांगितले. तसेच गुन्हा करताना तुकाराम ऊर्फ महाराज काशिनाथ जाधव (वय ३९, रा. गिरीम जाधववाडी, दौंड) याचे मारुती सेलेरिओ (एमएच ४२ एएच १५७०) या चारचाकी वाहनात जाऊन टेहळणी करायचे व येणे-जाणेसाठी गाडी वापरायचे अशी माहिती दिली. आरोपी तुकाराम जाधव फरारी झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचाही माग काढून त्यास दिनांक १६ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेऊन जेजुरी पोलीस स्टेशनचे स्वाधीन केले आहे.