शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षेपेक्षा अधिक कारावास भोगलेल्या तीन नायजेरियन नागरिकांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 21:34 IST

मॅट्रिमोनी साईटवरून तरूणीला ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी ठोठावली होती शिक्षा..

ठळक मुद्देसुनावलेला दंड भरण्यासाठी न्यायालयाने दोन महिन्यांची दिली मुदत

पुणे :  शिक्षेपेक्षा अधिक कारावास भोगलेल्या तिघा नायजेरियन नागरिकांची न्यायालयाने सुटका केली. तिघांना सुनावलेला दंड भरण्यासाठी न्यायालयाने दोन महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे तिघांची मुक्तता करण्याची मागणी बचाव पक्षाने केले होती. मॅट्रिमोनी साईटवरून चतु:श्रृंगी परिसरातील तरूणीला ऑनलाईन 38 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या तीन नायजेरियन व्यक्तींना तीन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.राणे यांनी सुनावली. ओगेयुरी इम्मनुल चिनासो, ओसारामेनसे समार्ट आणि टोपे ओलू ओले अशी त्या तिघांची नावे आहेत. चतु:श्रृंगी परिसरातील एका महिलने मॅट्रिमोनी साईटवर विवाहासाठी नोंदणी केली होती. ऑगस्ट 2015 मध्ये साइटवरून एका व्यक्तीची ओळख झाली. त्याने विवाह करण्याची तयारी दर्शवित ओळख वाढविली. त्यानंतर विविध कारणे सागून तरूणीकडून पैसे उकळले होते. गुन्ह्याचा तपास सायबर सेलने केल्यानंतर नायजेरियन व्यक्तींनी फसवणूक केल्याचे आढळून आले होते. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून तीन लॅपटॉप, 10 मोबाईल, 20 सिमकार्ड, आठ डोंगल मिळाले होते. या प्रकरणात तिघेही 3 वर्षे 7 महिने, 8 दिवस तुरूंगात आहेत. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेपेक्षा त्यांनी जास्त कारावास भोगला आहे. मात्र, त्यांची सुटका करण्यात न आल्याने बचाव पक्षातर्फे अ?ॅड. श्रीकृष्ण घुगे यांनी न्यायालयात अर्ज केला. यावर न्यायालयाने येरवडा कारागृहास म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यावेळी न्यायालयने तिघांना प्रत्येकी 5 लाख दंड सुनावला असून, हा दंड भरण्यासाठी आरोपींना दोन महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे.    दंड न भरल्यास तिघांना अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे. तिघांनी अद्याप दंड भरलेला नाही. या पार्श्वभूमीवर बंद्यांना सोडायचे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने पुढील आदेश करण्याबाबत येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे उपअधीक्षक पी.जे.जगताप यांनी न्यायालयात पत्राद्वारे सांगितले. यावर न्यायालयाने तिघांना सोडायचा आदेश दिला. याविषयी अ?ॅड. श्रीकृष्ण घुगे म्हणाले, न्यायालयाने तिघांना दंड भरण्यासाठी दोन महिन्याची मुदत दिली आहे. तसेच, या निर्णयाच्या विरोधात अपील करता येणार आहे. त्यामुळे तिघांना सोडण्यची मागणी केली होती.  

टॅग्स :PuneपुणेonlineऑनलाइनfraudधोकेबाजीPoliceपोलिस