बारामती : काटेवाडी ते बारामती मारुती व्हॅनच्या प्रवासादरम्यान प्रवाशाचे ३ लाख रुपये लंपास केल्याची घटना शनिवारी भरदिवसा घडली. शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.हनुमंत पांडुरंग ठोंबरे (रा. काटेवाडी, ता. बारामती) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तानाजी रामचंद्र ननवरे या संशयिताला अटक केली आहे. ननवरे याच्या व्हॅनमधून (एमएच १६/आर ३१९१) ठोंबरे बारामती ते काटेवाडी असा प्रवास करीत होते. या वेळी मार्केटयार्ड ते मोतीबाग यादरम्यान ठोंबरे यांची नजर चुकवून त्यांनी पिशवीत ठेवलेले रोख ३ लाख संशयित, अन्य ५ ते ६ महिलांनी लंपास केल्याचा संशय आहे. ठोंबरे यांनी बारामती येथील आयडीबीआय बँकेतून दुधाच्या पगारासाठी ही रक्कम काढली होती. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}