एका वर्षात पुणे शहरात साडेतीन लाख वाहने रस्त्यावर; वस्तू व सेवा करात कपात केल्यामुळे वाहन खरेदीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 20:34 IST2026-04-01T20:34:22+5:302026-04-01T20:34:44+5:30

एकूणच, पुण्यात वाहनांची संख्या वेगाने वाढत असून, विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांचा वाढता कल दिसून येत आहे

Three and a half lakh vehicles on the road in Pune city in a year; Vehicle purchases increase due to reduction in Goods and Services Tax | एका वर्षात पुणे शहरात साडेतीन लाख वाहने रस्त्यावर; वस्तू व सेवा करात कपात केल्यामुळे वाहन खरेदीत वाढ

एका वर्षात पुणे शहरात साडेतीन लाख वाहने रस्त्यावर; वस्तू व सेवा करात कपात केल्यामुळे वाहन खरेदीत वाढ

पुणे : शहरात वाहन खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत एकूण ३ लाख ४ हजार ६१० वाहनांची नोंदणी झाली होती. तर १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ही संख्या वाढून ३ लाख ४५ हजार ४५५ वर पोहोचली आहे. यंदा सुमारे ४० हजार ८४५ वाहनांची जास्तीचे भर पडली आहे. सरकारने वाहनांवरील वस्तू व सेवा करात कपात केल्यामुळे वाहन खरेदीत वाढ झाली आहे.

शहरातील वाढती वाहन संख्येमुळे वाहतूक कोंडीचे प्रश्न जटिल होताना यंदा मात्र वाहन खरेदीत वाढ झाली आहे. यामध्ये दुचाकी वाहनांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. मोटारसायकल नोंदणी १,९३,२९३ वरून २,२३,१४० इतकी झाली आहे. चारचाकी (मोटार कार) नोंदणीही ७०,६८० वरून ७७,४५२ पर्यंत वाढली आहे. याशिवाय ट्रॅक्टर, मालवाहू (गुड्स) आणि बस या श्रेणींमध्येही वाढ नोंदवली गेली आहे. मात्र ऑटो रिक्षा नोंदणीत किंचित घट झाली असून ११,९८८ वरून ११,४३१ इतकी संख्या झाली आहे. एकूणच, पुण्यात वाहनांची संख्या वेगाने वाढत असून, विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांचा वाढता कल दिसून येत आहे.

इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला

शहरात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता झपाट्याने वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. २०२४-२५ मध्ये एकूण १२,७३७ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली होती. आता २०२५-२६ मध्ये तब्बल ३७ हजार ८०८ वर पोहोचली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक मोटारसायकलींची संख्या १० हजार ७६५ वरून २९ हजार ३८८ पर्यंत वाढली आहे. तर इलेक्ट्रिक कार नोंदणी १ हजार २४८ वरून ७ हजार ४११ इतकी झाली आहे. बस आणि मालवाहू इलेक्ट्रिक वाहनांमध्येही वाढ दिसून येते.

सन २०२५-२६ मध्ये झालेली वाहन खरेदी

दुचाकी-- २२३१४०

कार--- ७७४५२

टॅक्सी--९८५५

रिक्षा---११४३१

बस---१७२३

रुग्णवाहिका---१५८

मालवाहू--१३६३५

तीन चाकी मालवाहू--२०४९

ट्रॅक्टर---३८०७

ट्रेलर---१३५

इतर-- २०७०

सन २०२५-२६ मध्ये झालेली ई-वाहन खरेदी

दुचाकी-- २९३८८
कार-- ७४११

तीनचाकी-- २५०
बस-- ४५

मालवाहू---३९६
टॅक्सी-- ३१८

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन विक्रीत वाढ झाली आहे. या वाढत्या वाहन विक्रीतून आरटीओच्या महसुलात वाढ झाला आहे. - स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Web Title : पुणे में वाहनों की बाढ़; जीएसटी कटौती से बिक्री में उछाल।

Web Summary : पुणे में वाहनों के पंजीकरण में भारी वृद्धि देखी गई, जो वित्त वर्ष 26 में 3.45 लाख से अधिक हो गई। कारों और इलेक्ट्रिक वाहनों के साथ दोपहिया वाहनों की बिक्री बढ़ी। जीएसटी में कटौती से खरीद को बढ़ावा मिला। आरटीओ का राजस्व बढ़ा।

Web Title : Pune sees surge in vehicles; GST cut fuels sales.

Web Summary : Pune witnessed a significant rise in vehicle registrations, exceeding 3.45 lakh in FY26. Two-wheeler sales soared, alongside cars and electric vehicles. GST reduction boosted purchases. RTO revenue increased.