फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर वारंवार अतिप्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 12:41 IST2023-04-02T12:38:50+5:302023-04-02T12:41:49+5:30

तरुणाच्या कुटुंब आणि मित्राकडूनही तरुणीला मारहाण

Threatening to make the photo viral, the girl is repeatedly assaulted | फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर वारंवार अतिप्रसंग

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर वारंवार अतिप्रसंग

बारामती : तरुणीसोबतचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत गुणवडी येथील एकाने तरूणीसोबत वेळोवेळी अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती येथे उघडकीस आला आहे. याबाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावीस वर्षीय तरूणी व आरोपी सोहम भोई (रा. गुणवडी, ता. बारामती)  यांचे २०१९ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. ओळखी नंतर त्यांच्यामध्ये शरीर संबंध आले.  यानंतर आरोपी त्याला वाटेल तेव्हा त्यांचे खाजगीतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवत होता, असे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.  दि. ३१ मार्च रोजी सदर पीडिता त्याच्याकडे गेली व त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याला राग आला. सोहम याने सदर तरूणीला गाडीवर बसवून मेडद या ठिकाणी नेले. 

तेथे सोहमची आई, बहिण, वडील व मित्र वैभव यांनी तिला मारहाण केली. ‘सोहमचा नाद सोड’ अशी धमकी दिली. यानंतर तरूणीने बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रर दिली. यानंतर सबंधीत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या तक्रारीवरून विविध कलमांतर्गत तसेच अ‍ॅट्रॉसिटी सिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास  उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे करत आहेत.

Web Title: Threatening to make the photo viral, the girl is repeatedly assaulted