Pune: फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी; त्रासामुळे युवतीने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:22 IST2026-04-06T12:22:18+5:302026-04-06T12:22:50+5:30

शेजारी राहणाऱ्या एका तरुणाशी युवती बोलत असल्याने आरोपी तिला त्रास देत होता

Threat to make photo viral on social media; Young woman takes extreme step due to harassment | Pune: फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी; त्रासामुळे युवतीने उचलले टोकाचे पाऊल

Pune: फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी; त्रासामुळे युवतीने उचलले टोकाचे पाऊल

पुणे : तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन युवतीने इमारतीतून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बाणेर भागात घडली. आरोपी तरुणाने युवतीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. साक्षी शिवाजी आवटे (वय १७, रा.बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गोरख सुग्रीव गोरे (वय २१, सध्या रा.एफ रेसीडन्सीजवळ, बालेवाडी, मूळ रा.शंकरनगर, पाटोदा, जि.जालना) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीचा भाऊ दीपक शिवाजी आवटे (वय २१) याने बाणेरपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या एका तरुणाशी युवती बोलत असल्याने आरोपी तिला त्रास देत होता. आरोपी तरुणाने तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. शनिवारी (दि. ४) सकाळी साडेअकराच्या सुमारास युवतीने इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली. पुढील तपास गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक अलका सरग करत आहेत.

Web Title : पुणे: फोटो वायरल करने की धमकी के बाद युवती ने की आत्महत्या

Web Summary : पुणे में एक 17 वर्षीय युवती ने एक युवक द्वारा उसकी तस्वीरें ऑनलाइन पोस्ट करने की धमकी देने के बाद आत्महत्या कर ली। आरोपी गोरख गोरे पर आत्महत्या के लिए उकसाने का आरोप लगाया गया है। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Pune: Teen Commits Suicide After Photo Viral Threat

Web Summary : A 17-year-old girl in Pune committed suicide after being harassed by a young man who threatened to post her photos online. The accused, Gorakh Gore, has been charged with abetment to suicide. Police are investigating.