पुणे: दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या ६ इ २६०८ या विमानालापुणेविमानतळावर आगमनानंतर बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली होती. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या विमानाचे नियोजित आगमन रात्री ८:४० वाजता अपेक्षित होते. मात्र, हे विमान रात्री ९:२४ वाजता पुणे विमानतळावर उतरले. त्यानंतर रात्री ९:२७ वाजता विमान पार्किंग बे क्रमांक ३ येथे पार्क करण्यात आले.
दरम्यान, एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी)कडून एप्रन कंट्रोलला बॉम्ब धमकीची माहिती देण्यात आली. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने विमानाला आयसोलेशन बे येथे हलविण्यात आले. एप्रन कंट्रोलने तत्काळ सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क केले. बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमिटी (बीटीएसी) ची बैठक बोलाविण्यात आली. समितीच्या आढाव्यानंतर बॉम्बशोध व नाशक पथक (बीडीडीएस) कडून विमानाची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद बाब आढळून आली नाही.
Web Summary : A Delhi-Pune Indigo flight received a bomb threat upon arrival. Authorities swiftly responded, isolating the plane and conducting a thorough search. No suspicious objects were found after the assessment.
Web Summary : दिल्ली-पुणे इंडिगो विमान को आगमन पर बम की धमकी मिली। अधिकारियों ने तुरंत प्रतिक्रिया दी, विमान को अलग किया और गहन तलाशी ली। आकलन के बाद कोई संदिग्ध वस्तु नहीं मिली।