शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

कारमधून गावठी दारूची वाहतूक करणारे अटकेत; ४२० लिटर दारू जप्त, वानवडीत पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 16:24 IST

गावठी दारूच्या वाहतुकीची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावून कार पकडली व त्यामधून १२ प्लास्टिक कॅन जप्त केले

पुणे : कारमधून गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना वानवडीपोलिसांनीअटक केली. त्यांच्याकडून गावठी दारू असलेले प्लास्टिक कॅन जप्त करण्यात आले. लियाकत रोहित अब्बासी (वय ३२, रा. ढोबरवाडी, सोपानबाग, घोरपडी) आणि समीर संजय राठोड (वय २३, रा. शिंदवणे काळेशिवार, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

वानवडीपोलिस ठाण्याचे पथक होळीच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत होते. त्यावेळी अब्बासी आणि राठोड हे कारमधून गावठी दारू वाहतूक करीत असल्याची माहिती तपास पथकातील पोलिस हवालदार दया शेगर आणि अभिजित चव्हाण यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून कार अडवली. कारमधून १२ प्लास्टिक कॅन जप्त करण्यात आले. कॅनमध्ये ४२० लिटर गावठी दारू होती. होळी, धुळवडीला दारूला मागणी वाढत असल्याने आरोपी अब्बासीने एकाच्या सांगण्यावरून समीर राठोड याच्याकडून दारू खरेदी केल्याची माहिती चौकशीत दिली. 

वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलिस निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, महेश गाडवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, आशिष कांबळे, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विष्णू सुतार, अभिजीत चव्हाण, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले आणि अर्शद सय्यद यांनी ही कामगिरी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Two arrested in Wanwadi for transporting illicit liquor; 420 liters seized.

Web Summary : Wanwadi police arrested two individuals transporting 420 liters of illicit liquor in a car. The suspects, Abbas and Rathod, were caught during a patrol. They intended to sell the liquor due to increased demand during Holi.
टॅग्स :PuneपुणेWanvadiवानवडीliquor banदारूबंदीPoliceपोलिसHoliहोळी 2026MONEYपैसाArrestअटक