Video: या घैसासने महिलेचा जीव घेतला; कारवाई झाली पाहिजे, भाजप महिला आघाडीकडून 'त्या' रुग्णालयाची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:51 IST2025-04-04T16:50:26+5:302025-04-04T16:51:21+5:30

घैसासला पैसे हवे आहेत, त्याच्यामुळे दोन बाळाच्या डोक्यावरचे छत्र हरवले, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे

This tragedy took the life of a woman action must be taken BJP women's front vandalizes 'that' hospital | Video: या घैसासने महिलेचा जीव घेतला; कारवाई झाली पाहिजे, भाजप महिला आघाडीकडून 'त्या' रुग्णालयाची तोडफोड

Video: या घैसासने महिलेचा जीव घेतला; कारवाई झाली पाहिजे, भाजप महिला आघाडीकडून 'त्या' रुग्णालयाची तोडफोड

पुणे : पुण्याच्या डॉ घैसास यांच्या खासगी रुग्णालयात भाजप महिला आघाडीकडून तोडफोड करण्यात आली आहे. दीनानाथ हॉस्पिटल घटनेत महिलेला उपचाराबाबत खर्च सांगणारे हेच घैसास डॉक्टर आहेत. त्याठिकाणी जाब विचारण्यासाठी भाजप महिला आघाडीच्या महिला गेल्या असता त्यांनी तोडफोड केली आहे. या घैसासने महिलेचा जीव घेतला आहे. त्याला पैसे हवे आहेत. दोन बाळाच्या डोक्यावरचे छत्र हरवले आहे. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणत महिला आंदोलकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली आहे. कोथरूडच्या क्लिनिकच्या बाहेर कुंड्याही फोडल्या आहेत.  

शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका गर्भवती महिलेला जीव गमावावा लागला. प्रसूती वेदना तीव्र झाल्याने महिलेला खासगी गाडीने २५ किलोमीटर अंतरावरील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली. तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र, त्या रुग्णालयात दाखल करताच तिचा मृत्यू झाला. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेले. त्यावेळी त्यांच्याकडे १० लाखांची मागणी करण्यात आली. त्यावर अडीच लाख रुपये आता तातडीने भरतो. उपचार सुरू करा, अशी विनंती सुशांत यांनी केली. पण, रुग्णालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. यात गर्भवतीची तब्बेत खालावली आणि त्यातच जीव गेला. या घटनेनंतर रुग्णालयाच्या बाहेर राजकीय पक्ष, संघटना यांच्याकडून आंदोलन करण्यात आले. राज्यातून या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. 

अशातच रुग्णालय प्रशासनाने आपली बाजू मांडत तीन पानी लेखाजोगा समोर आणला आहे. त्यामध्ये डॉ गैसास यांनी महिलेला प्रेग्नेंसी बद्दल डॉक्टर गैसास यांनी त्यांना माहिती दिली. दर सात दिवसांनी तपासणीस बोलावले त्याप्रमाणे त्यांनी 22 तारखेस येणे अपेक्षित होते परंतु तेव्हा त्या आल्या नाहीत. असे म्हणत रुग्णालयाची बाजू मांडली आहे. कमी वजनाची सात महिन्यांची जुळी मुले जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी दोन ते अडीच महिने NICU चे उपचार लागतील हे समजावून सांगितले. व रुपये दहा ते वीस लाख खर्च एकंदर येऊ शकतो त्याची कल्पना देण्यात आली. त्यावर रुग्णांच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या व मी प्रयत्न करतो असे प्रशासनाने त्या पत्रात नमूद केले आहे. 

Web Title: This tragedy took the life of a woman action must be taken BJP women's front vandalizes 'that' hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.