‘असले फालतू…’ सुरेश धसांच्या ‘मुन्नी’ वक्तव्यावर अजित पवार संतापले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:33 IST2025-01-09T17:27:08+5:302025-01-09T17:33:28+5:30

सुरेश धस यांनी म्हटले होते, “राष्ट्रवादीमध्ये एक मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक वरिष्ठ मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे,

This is useles Ajit Pawar gets angry over Suresh Dhas Munnistatement | ‘असले फालतू…’ सुरेश धसांच्या ‘मुन्नी’ वक्तव्यावर अजित पवार संतापले 

‘असले फालतू…’ सुरेश धसांच्या ‘मुन्नी’ वक्तव्यावर अजित पवार संतापले 

पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. भाजप नेते सुरेश धस यांनी “राष्ट्रवादीमध्ये एक मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक वरिष्ठ मुन्नी आहे,” असे विधान केले होते. त्यांच्या या विधानांवर आज अजित पवार यांनी भाष्य केले आहे.

अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, “राष्ट्रवादीमध्ये नेमकी बडी मुन्नी कोण आहे?” यावर ते म्हणाले, “हा प्रश्न तुम्ही सुरेश धस यांनाच विचारा. हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल, तर मी स्पष्ट नाव घेऊन बोलणार आहे. त्यामुळे त्यालाच विचारा कोण आहे.” असं म्हणत अजित पवार यांनी उलट सवाल केला.

दरम्यान, सुरेश धस यांनी म्हटले होते, “राष्ट्रवादीमध्ये एक मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक वरिष्ठ मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे, आणि त्या मुन्नीला म्हणा, ‘तू इथे ये.’ कुठे मिटकरी, सूरज चव्हाण या लहान पोरांना बोलायला लावते. मला माहिती आहे, आणि मुन्नीलाही माहिती आहे की मी कोणाबद्दल बोलत आहे.” सुरेश धस यांच्या या विधानानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. अखेर राष्ट्रवादीतील ही मुन्नी कोण? यावर चर्चा रंगताना दिसली. यावर आज अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी संताप व्यक्त केला.

अजित पवार यांना बीडच्या पालकमंत्री पदाबद्दल प्रश्न विचारण्यात आला, 'तुम्ही स्वतःकडे पालकमंत्री पद घेणार का? यावर ते म्हणाले, पालकमंत्री कुठे कुणाला करायचा, हा सर्वस्वी अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो. तसं मंत्रिमंडळ करण्याचा, खातेवाटप करण्याचा त्यांचा अधिकार आहे. तो अधिकार ते वापरतील.' असं म्हणत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

Web Title: This is useles Ajit Pawar gets angry over Suresh Dhas Munnistatement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.