पुणे वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत केली तेराशे वाहने जप्त; संचारबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी 476 जणांवर गुन्हे दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 07:04 PM2020-04-17T19:04:08+5:302020-04-17T19:04:18+5:30

विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात

Thirteen hundreds vehicles seized in two days by pune traffic police | पुणे वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत केली तेराशे वाहने जप्त; संचारबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी 476 जणांवर गुन्हे दाखल 

पुणे वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत केली तेराशे वाहने जप्त; संचारबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी 476 जणांवर गुन्हे दाखल 

Next
ठळक मुद्देशहरातील संचारबंदी तसेच जमावबंदीचे सुधारित आदेश जारी

पुणे : संचारबंदी आणि टाळाबंदीच्या काळात घराबाहेर पडण्यास मनाई केली असताना बिनदिक्कतपणे बाहेर पडणाऱ्यांवर पुणे वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन दिवसांत तेराशे वाहने पोलिसांनी जप्त केली असून त्यात सर्वाधिक संख्या दुचाकी वाहनांची आहे. याबरोबरच आता आहे.सकाळी फेरफटका मारायला बाहेर पडणारे तसेच विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आले आहेत. 
तीन मेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आल्यानंतर सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे शहरातील संचारबंदी तसेच जमावबंदीचे सुधारित आदेश जारी केले आहेत.प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानंतर शहरातील २२ भागात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.संचारबंदीचे आदेश लागू झाल्यानंतरही शहरात अनेकजण किरकोळ कामांसाठी घराबाहेर पडत आहेत.सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत शहरातील किराणा माल, भाजीपाला विक्रीची दुकाने खुली ठेवण्यात आली आहेत.काहीजण किरकोळ कामाचे निमित्त करून घरातून बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे.करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी नागरिकांनी शक्यतो एकमेकांशी संपर्क टाळावा.सकाळी फिरायला जाणाऱ्यांनी बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.पोलिसांनी केलेल्या आवाहनाकडे काणाडोळा करून अनेकजण  घराबाहेर पडत आहेत.अशांविरोधात पोलिसांनी थेट संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. 

हडपसर, स्वारगेट, बिबवेवाडी पोलिसांनी गुरूवारी (१६ एप्रिल)सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना समज दिली.काहींना उठाबशा काढण्याची शिक्षाही दिली.दरम्यान, शुक्रवारी (१७ एप्रिल) हडपसर भागात काहीजण फेरफटका मारायला बाहेर पडले.हडपसर भागातील तुकाई टेकडी, ग्लायडिंग सेंटर येथे सकाळी फेरफटका मारणाºया १२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी सांगितले. अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडणारे नागारिक पोलिसांकडून डिजिटल परवाना घेतात.पोलिसांनी के लेल्या पाहणीत काहीजण किरकोळ कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत.

संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने 476 जणांवर गुन्हे दाखल 
विनाकारण घराबाहेर पडणा- या वाहनचालकांविरोधात हडपसर, बिबवेवाडी, चतु:श्रृंगी, सातारा रस्ता भागात कारवाई करण्यात आली.गेल्या दोन दिवसात तेराशे वाहने जप्त करण्यात आली आहेत.संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ४७६ नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच मास्क न परिधान करता बाहेर पडणाºया ७२ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिली.

Web Title: Thirteen hundreds vehicles seized in two days by pune traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.