शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ खाडी देशांकडे मागितली भरपाई
2
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
3
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
4
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
5
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
6
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
7
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
8
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
9
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
10
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
11
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
12
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
13
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
14
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
15
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
16
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
18
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
19
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
20
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबाचा विचार करुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 04:05 IST

\Sपुण्याचे उद्योजक पाषाणकरांनी उलगडला ''''त्या'''' ३३ दिवसांचा प्रवास लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ज्या लोकांची तोंड वर करून बोलायची ...

\Sपुण्याचे उद्योजक पाषाणकरांनी उलगडला ''''त्या'''' ३३ दिवसांचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ज्या लोकांची तोंड वर करून बोलायची हिंमत नव्हती़, ते वाट्टेल ते बोलू लागले, ते सहन होत नव्हते़ व्यवसायात काही चुकीचे निर्णय झाल्याने आर्थिक नुकसान झाले होते़ त्याच्या तणावातून आत्महत्येचा विचार आल्याने घरातून निघून गेलो होतो़ पण बाहेर पडल्यावर कुटुंबाचा विचार मनात आल्याने आत्महत्येचा विचार दूर सारला़ पण पुण्यात परत न येण्याचा विचार होता, असे प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांनी सांगितले़

पुणे पोलिसांच्या पथकाने गौतम पाषाणकर यांना जयपूर येथील चंद्रगुप्त फोर्ट या हॉटेलमधून मंगळवारी ताब्यात घेतले़ त्यांना बुधवारी सायंकाळी पुण्यात आणण्यात आले़ यावेळी पाषाणकर हे पत्रकारांशी बोलत होते़

पाषाणकर यांनी सांगितले की, गेल्या २ -३ महिन्यांपासून ताणतणावात होतो़ त्यातून माझ्यावर मानसिक भडीमार झाला़ कुठलीही परिस्थिती साथ देत नव्हती़ किरकोळ रक्कमेसाठी लोक बोलू लागल्याने त्याचा मानसिक त्रास झाला़ ते सहनशीलतेच्या बाहेर होते़ त्यातूनच आत्महत्येचा विचार करुन पुण्यातून कोल्हापूरला गेलो़ तेथून बसने बंगलोर व तेथून तिरुपती बालाजी करीत कन्याकुमारीपर्यंत गेलो होतो़ या प्रवासादरम्यान शांतपणे विचार करत गेलो़ तेव्हा कुटुंबाचा विचार मनात आला़ हे आपले काम नाही, असे मनाने घेतले़ पण पुण्यात परत येण्याचा विचार नव्हता़ त्यामुळे मी बसने फिरत राहिलो़ पोलीस आले नसते तर दुसºया दिवशी आपण उदयपूरला निघून जाणार होतो़

पुण्यातून निघताना ९० हजार रुपये बरोबर घेतले होते़ छोट्या हॉटेलमध्ये मुक्काम करायचा़ साधे जेवण घ्यायचे़ बसने फिरायचे़ खूप विचार करायचा असा दिनक्रम सुरु होता, असे त्यांनी सांगितले़

गौतम पाषाणकर यांचे चिरंजीव कपिल पाषाणकर यांनी सांगितले की, आम्ही स्वतंत्रपणे व्यवसाय करतो़ मी महत्वाच्या निर्णयाच्या वेळी वडिलांचा सल्ला घेतो़ आमची ८०० कोटींची उलाढाल होती़ आम्ही मोटारीची डिलरशीप बंद झाली़ त्या कठीण काळामधून बाहेर पडलो होतो़ पण वडिलांनी त्यांच्या आर्थिक अडचणी, मानसिक स्थितीची कधी माहिती दिली नाही़ त्यांना आता व्यवसायातून तुम्ही रिटायर व्हा़ पुढील ६ महिन्यात सर्व स्थिरस्थावर करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.

-------------

''''पोलीस इतका शोध घेतील असे वाटले नव्हते''''

आपण घरातून निघून गेल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार होईल़ पोलीस शोध घेतील, याची कल्पना होती़ परंतु, पोलीस इतका शोध घेतील, असे वाटले नव्हते, असे गौतम पाषाणकर यांनी सांगितले़. आपण महाराष्ट्राबाहेर होतो़ तसेच बरोबर मोबाईल अथवा कोणाशी संपर्क नसल्याने आपला इतका ठिकाणी शोध घेतला जात असल्याचे समजले नसल्याचे त्यांनी सांगितले़.