निमगाव केतकीत परमिट रूम व बिअरबारवर चोरट्यांचा डल्ला; सव्वा लाखाची दारू लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 18:25 IST2021-06-22T18:25:23+5:302021-06-22T18:25:59+5:30
हॉटेलचा कडी, कोयंडा तोडून चोरल्या दारूच्या बाटल्या

निमगाव केतकीत परमिट रूम व बिअरबारवर चोरट्यांचा डल्ला; सव्वा लाखाची दारू लंपास
बाभुळगाव: इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे न्यु गजराज परमिट रूम व बिअरबार या हाॅटेलवर चोरटयांनी डल्ला मारून सव्वा लाख रुपयांची इंग्लिश दारू लंपास केल्याची घटना घडली आहे. रविवार ते सोमवार सकाळी ७ पर्यंत अज्ञात चोरटयांनी हॉटेलचा कडी कोयंडा तोडून दारूच्या बाटल्या चोरल्याचे राहुल सोपान भोंग (वय ४३, रा. निमगाव केतकी) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
भोंग हे नेहमी प्रमाणे रविवारी रात्री १० वाजता हाॅटेल बंद करून घरी गेले. तर हाॅटेलमधील कर्मचारी हे हाॅटेल शेजारील स्वतंत्र रूममध्ये झोपले होते. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी कामगारांच्या खोलीची कडी बाहेरून लावली. व हाॅटेलच्या दरवाजाचा कडी, कोयंडा तोडून हाॅटेलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर गोडाऊनमधील इंग्लिश दारू बाटल्यांनी भरलेले सव्वा लाख रुपये किमतीचे बॉक्स चोरटयांनी पळून नेले. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.