शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
6
aumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
7
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
8
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
9
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
10
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
11
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
12
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
13
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
14
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
15
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
16
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
17
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
18
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
19
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
20
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’

...अन् ती फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट महिलेला 8 लाखाला पडली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 11:01 PM

घरात शिरुन ज्येष्ठ नागरिक महिलेची तिजोरी साफ

पुणे : फेसबुकवर झालेल्या ओळखीतून ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरलेल्या एकाने तिजोरीतील ८ लाख ८ हजारांचे दागिने लांबवल्याची घटना खराडी भागातील एका सोसायटीत घडली. याप्रकरणी राहुल हमीर मर्चंट (वय ४३, रा. टस्कन इस्टेट, खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मर्चंट यांचा शेअर व्यावसायिक आहेत. खराडी भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत ते आणि त्यांची ६९ वर्षाची आई राहायला आहे. जुलै २०१८ मध्ये त्यांच्या आईला अनिल ननवाणी याने फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ती आईने स्वीकारल्यावर ननवाणी याने त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याला आईवडिलांनी घराबाहेर काढले असून त्यास कोणाचा आधार नाही, अशा प्रकारचे भावनिक चॅटिंग करत होता. ओळख वाढल्यानंतर राहुल मर्चंट कामानिमित्त मुंबईला गेले असल्याचे पाहून तो दोन ते तीन वेळा त्यांच्या घरी आला होता.दरम्यान गेल्या वर्षी  १६ डिसेंबर २०१८ रोजी ते काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्यावेळी त्यांची आई घरात एकटी होती. आई स्वयंपाकाच्या गडबडीत होती. दुपारी एकच्या सुमारास ननवाणी हा घरी आला. आईचे लक्ष नसल्याची संधी साधून तिजोरीची चावी चोरली. तिजोरीतील रोकड, सोने-चांदीचे दागिने आणि दोन घड्याळे लांबवून तो पसार झाला. तिजोरीतील दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे नुकतीच तक्रार दिली. चंदन नगर पोलिसांनी अनिल ननवाणी (रा. मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक या गुन्ह्याचा तपास करत आहेत. 

टॅग्स :theftचोरीFacebookफेसबुक