शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Mayor: महापौर निवडीनंतर अजितदादांच्या निधनामुळे पुण्यात भाजपकडून जल्लोष होणार नाही - गणेश बिडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 19:13 IST

महापालिकेच्या पहिल्याच मुख्यसभेत त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर पदाची निवड येत्या ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. महापालिकेत भाजपचे ११९ नगरसेवकांचे स्पष्ट संख्याबळ असल्याने ही निवड प्रक्रिया केवळ औपचारिक स्वरूपाची आहे. तरी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या निवडीनंतर कोणताही आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतला असल्याची माहिती गटनेते गणेश बिडकर यांनी दिली आहे.

पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी ९ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांचाच महापौर व उपमहापौर होणार हे निश्चित आहे. महापौरपदाच्या शर्यतीत अखेर मंजुषा नागपुरे यांचे नाव आघाडीवर आहे. उपमहापौर पदासाठी परशुराम वाडेकर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसही या महापौर आणि उपमहापौरपदाच्या शर्यतीत उतरले आहे.  परंतु भाजपचा महापौर आणि उपमहापौर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. म्हणून महापौर व उपमहापौर निवडीनंतर गुलाल, फुले, फटाके अथवा कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता अत्यंत साध्या पद्धतीने निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

 यासंदर्भात बोलताना गणेश बिडकर म्हणाले, "माझ्यासह पुणे महापालिकेतील अनेक नगरसेवकांनी स्वर्गीय अजितदादांसोबत प्रत्यक्ष काम केले आहे. पुणे शहराच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. महापालिकेच्या पहिल्याच मुख्यसभेत त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. राजकारणापेक्षा माणुसकी, संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्ये अधिक महत्त्वाची आहेत."

सिहंगड रोडला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार

महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थित होणार आहे. निवडणुकीच्या दिवशी पीठासीन अधिकारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देतात. त्यानंतर अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक प्रक्रिया राबवून सभागृहात मतदान होते. भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे नागपुरे आणि वाडेकर यांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या निवडीच्या घोषणा झाल्यानंतर सिंहगड रोड परिसराला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार आहे. नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध विजयी झाल्या आहेत. मंजूषा नागपुरे या भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेच्या कामाच त्यांचा चांगला अनुभव आहे. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांनी काम केलेले आहे. उपमहापौरपदासाठी भाजपकडून परशुराम वाडेकर यांनी अर्ज भरला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune BJP forgoes celebrations after mayor election due to Pawar's demise.

Web Summary : Following Pune's mayor election on February 9th, BJP foregoes celebratory events due to Deputy CM Ajit Pawar's passing. Manjusha Nagpure is likely to become mayor; Parshuram Wadekar, deputy. The party will pay respects to Pawar.
टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBJPभाजपाMayorमहापौरNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका