शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

पुण्याची लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही : काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 20:34 IST

आघाडी होवो अथवा न होवो पुण्याची जागा काँग्रेसच लढवणार आहे.

ठळक मुद्देपुण्याची जागा यावेळी प्रचंड मताधिक्याने जिंकून आणण्याची एकजुटीने शपथ पक्ष देईल तो उमेदवार मान्य

पुणे: लोकसभेसाठी मित्रपक्षाने पुण्याच्या जागेवर कितीही हक्क सांगण्याचा प्रयत्न केला तरी ही काँग्रेसची परंपरागत जागा आहे. त्यामुळे ती सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट पुण्याची जागा यावेळी प्रचंड मताधिक्याने जिंकून आणण्याची शपथ आम्ही एकजुटीने घेतली असल्याचे, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या नेत्यांनी शुक्रवारी(दि.२५ मे) ठणकावून सांगितले. केंद्रातील मोदी सरकारच्या ४ वर्षांच्या कारकिर्दीच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीने येत्या सोमवारी (दि. २८) काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकारांच्या बैठकीत सर्वच नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघावर केलेल्या दाव्याची खिल्ली उडवली. या बैठकीला शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, अ‍ॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, नगरसेवक अविनाश बागवे, लता राजगुरू, संगिता तिवारी, नीता रजपूत, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, कामगार संघटनेचे सुनिल शिंदे, रमेश अय्यर, सुनिल पंडित आदी उपस्थित होते.बागवे म्हणाले, आघाडी होवो अथवा न होवो पुण्याची जागा काँग्रेसच लढवणार आहे. मोदी सरकारने गेली ४ वर्षे देशातील जनतेची फसवणूक चालवली आहे. वर्षाला २ कोटी युवकांना रोजगार यासारखी आश्वासने देत मोदी सत्तेवर आले मात्र त्यांचा प्रत्येक निर्णय देशासाठी घातक ठरला आहे. नोटाबंदीमुळे उद्योग बुडाले, त्यातून नोकºया गेल्या, शिष्यवृती बंद केल्यामुळे विद्यार्थी दिशाहीन झाले. दुष्काळ संपला तरीही पेट्रोलवर लावलेला कर अजून सुरूच आहे. सर्वच बाबतीत जनतेला आश्वासित करण्यात मोदी सरकारला अपयश आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम भारतीय जनतेला सहन करावा लागतो आहे.शिवरकर म्हणाले, लोकसभेचा पुणे मतदार संघ हा काँग्रेसचा परंपरागत मतदार संघ आहे. तो आम्ही घटक पक्षाला देऊ शकत नाही. आमच्याकडे सक्षम उमेदवारांची वाणवा नाही. पक्ष देईल तो उमेदवार मान्य करू. गटबाजीचा काय त्रास होतो त्याचा अनुभव पक्षाला आता आला आहे. त्यामुळेच गटबाजी विसरून हा मतदारसंघ परत काबीज करायचाच अशी शपथच नेते मंडळींनी एकत्रितपणे घेतली आहे. मूक मोर्चा सोमवारी सकाळी साडेदहा वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरू होईल व स्वारगेट येथील केशवराव जेधे पुतळ्याजवर विसर्जीत होईल अशी माहिती बैठकीत देण्यात आली. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक