देखभाल दुरुस्तीसाठी निधीच नाही

By Admin | Updated: June 25, 2015 03:38 IST2015-06-25T03:38:49+5:302015-06-25T03:38:49+5:30

तब्बल चार हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या पुणे महापालिकेकडे शहरातील लाखो वाहनांची वर्दळ असलेल्या पुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी

There is no fund for maintenance | देखभाल दुरुस्तीसाठी निधीच नाही

देखभाल दुरुस्तीसाठी निधीच नाही

पुणे : तब्बल चार हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या पुणे महापालिकेकडे शहरातील लाखो वाहनांची वर्दळ असलेल्या पुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील प्रमुख १८ पुलांचे महापालिकेने तब्बल १५ वर्षांनंतर आॅडिट केले असले, तरी या आॅडिटमध्ये सुचविण्यात आलेली या पुलांची देखभाल दुरुस्तीची कामे केवळ निधी नसल्याने कागदावरच असल्याचे समोर आले आहे. मुठा नदीवर असलेले अनेक पूल हे ५० वर्षांहून अधिक जुने असतानाही त्याच्याकडे महापालिकेकडून सुरक्षेच्या दृष्टीने काणाडोळा केला जात आहे.
शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या मुठा नदीमुळे शहराचे दोन भाग पडलेले आहेत. या दोन्ही भागांना जोडणारे सर्व पूल जुने असून, यावरून दररोज लाखो वाहनांची वर्दळ असते. रस्त्याची नियमितपणे देखभाल दुरुस्ती करण्यात येते, तशीच पुलांचीही देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. १९९७-९८ मध्ये महापालिकेकडून या पुलांचे सेफ्टी आॅडिट करण्यात आलेले होते. त्यानंतर काही पुलांची किरकोळ स्वरूपातील दुरुस्ती करण्यात आली. त्या नंतर महापालिकेने थेट २०१३-१४ मध्येच काही पुलांच्या आॅडिटचे काम हाती घेतले होते. त्याचा अहवालही महापालिकेस प्राप्त झाला. त्यात अनेक पुलांची नियमित देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, केवळ निधी नसल्याने प्रशासनाने हा आॅडिट अहवाल गुंडाळून ठेवला आहे.

Web Title: There is no fund for maintenance