शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

महापालिकेच्या पाण्याची होते चोरी : आयुक्तांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 7:00 AM

पुणेकरांना तुम्हाला माहित आहे का, तुमचे पाणी चोरीला जातेय ?

ठळक मुद्दे चोरी-गळतीने साडेपाच टीएमसीचे होतेय नुकसानमहापालिका आणि पाटबंधारे विभागात झालेला पाणी करार फेब्रुवारी २०१९मधे संपुष्टात उच्च न्यायालयाने पाणी कोटा निश्चित करण्याचे महापालिकेला दिले आदेश

- विशाल शिर्के पुणे : पुणेकरांना तुम्हाला माहित आहे का, तुमचे पाणी चोरीला जातेय ? एक नव्हे दोन नव्हे तब्बल साडेपाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी चोरी आणि गळतीद्वारे झिरपत आहे. खुद्द महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी जलसंपदा विभागाला ही माहिती लेखी कळविली आहे. चोरी कोणत्या मार्गाने होते याचे मात्र स्पष्टीकरण त्यात देण्यात आले नाही. महानगरपालिकेचा पाणी वापराबाबत जलसंपदा विभागाच्या वाद निवारण अधिकारी, जलसंपत्ती प्राधिकरण आणि उच्च न्यायालयात दावे सुरु आहेत. महापालिका आणि पाटबंधारे विभागात झालेला पाणी करार फेब्रुवारी २०१९मधे संपुष्टात आला आहे. उच्च न्यायालयाने पाणी कोटा निश्चित करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने १२ एप्रिल २०१९ रोजी जलसंपदा विभागाला लेखी कळविले असून, त्यात प्रथमच गळती बरोबरच पाणी चोरीचा देखील उल्लेख केला आहे. ही कागदपत्रे '' लोकमत '' ला मिळाली आहेत. सप्टेंबर २०१७ मध्ये पुणे शहराला लोकसंख्येच्या नुसार वार्षिक ८.१९ टीएमसी (दररोज ६३५ एमएलडी) पाणी वापरास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. त्यानंतर खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या ४ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत पुणे शहराला वार्षिक ११.५० टीएमसी (दररोज ८९२ एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय झाला. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहराला पाणी कमी देणे परवडणारे नसल्याने, राज्य सरकारने १३०० ते १३५० दशलक्ष लिटर पाणी वापराची सूचना दिली होती. सध्याही तसाच वापर सुरु आहे. हा पाणीवापर वार्षिक १७ टीएमसी इतका होतो. महापालिकेची लोकसंख्या, तरल लोकसंख्या, हद्दीलगतची गावे, व्यावसायिक पाण्याचा वापर, पाच वर्षे वयाखालील मुलांची संख्या, भाडेकरु, विविध स्पर्धा परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांचा विचार पाणी वापरात आवश्यक असल्याचे महापालिका राव यांनी १२ एप्रिल २०१९ रोजी जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. शहरातील वितरण व्यवस्था अंदाजे ४० ते ५० वर्षे जुनी असून, त्यातून गळती आणि पाणी चोरीचे प्रमाण तब्बल २५ टक्के असल्याचे म्हटले आहे. या पुर्वी महापालिकेने दिलेल्या माहितीमध्ये ३५ ते ४० टक्के पाणी गळती असल्याचा उल्लेख येतो. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीSaurabh Raoसौरभ राव