Pune Crime| तरुणीला गुंगीचे औषध पाजून मालकाने केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 09:52 IST2022-09-16T09:50:49+5:302022-09-16T09:52:10+5:30

मालकाविरूद्ध खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल...

The young woman was raped by the owner after giving her gungy medicine pune crime | Pune Crime| तरुणीला गुंगीचे औषध पाजून मालकाने केला बलात्कार

Pune Crime| तरुणीला गुंगीचे औषध पाजून मालकाने केला बलात्कार

पुणे : ऑफिसमध्ये नोकरीस आलेल्या तरुणीला कामाच्या बहाण्याने वारंवार बोलावून ‘तू मला आवडतेस’ म्हणत जवळ ओढण्याबरोबरच बाहेरगावी कामाच्या निमित्ताने घेऊन जात गुंगीचे औषध पाजून बलात्कार करणाऱ्या मालकाविरूद्ध खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदयन सरूश जैन (वय ३६, राहुल रेसिडन्सी, वानवडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २६ वर्षीय तरुणीने फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार २१ जानेवारी २०२१ ते १८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला.

आरोपी जैन याची आर्किटेक्चर प्रोपरायटरी फर्म आहे. याठिकाणी तरुणी कामाला होती. कामाच्या बहाण्याने आरोपी वारंवार बोलावून तिला जवळ ओढत असे. कामाच्या निमित्ताने तिला वारंवार बाहेरगावी नेत तिच्या कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध घालत तिच्या इच्छेविरूद्ध शरीरसंबंध ठेवले. मध्यप्रदेशच्या हॉटेलसह ऑफिसमध्ये देखील हे प्रकार वारंवार केल्याचे तरूणीने फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. त्यानुसार आरोपीवर ३७६ (२), ३५४ (अ), ३३८, ५०६ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वैशाली टोटेवार करीत आहेत.

Web Title: The young woman was raped by the owner after giving her gungy medicine pune crime