महिलेने ३ फ्लॅट घेतले, ८७ लाख न देताच परस्पर विकले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 02:04 PM2024-01-15T14:04:09+5:302024-01-15T14:11:16+5:30

फ्लॅटचे पूर्ण पैसे देण्यापूर्वीच या महिलेने हे फ्लॅट इतरांना विकून ८७ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार

The woman bought 3 flats sold them to each other without paying 87 lakhs | महिलेने ३ फ्लॅट घेतले, ८७ लाख न देताच परस्पर विकले

महिलेने ३ फ्लॅट घेतले, ८७ लाख न देताच परस्पर विकले

पुणे: विकसकाकडून एका महिलेने तीन फ्लॅट घेतले. विकसकाने त्याची स्टॅम्प ड्यूटीही भरली. मात्र, त्या फ्लॅटचे पूर्ण पैसे देण्यापूर्वीच या महिलेने हे फ्लॅट इतरांना विकून ८७ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत रफिक सालेमोहम्मद जाफरानी (वय ६२, रा. सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नूतन दिलीप शिनोलीकर (वय ३९, रा. धनकवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हवेली दुय्यम निबंधक कार्यालयात ३० मार्च २०२० ते आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी विकसित केलेल्या हेमी पार्क या सोसायटीमधील तीन फ्लॅट नूतन शिनोलीकर यांनी १ कोटी ३१ लाख ५१ हजार ९०४ रुपयांना घेतले. त्याची स्टॅम्प ड्यूटी ८ लाख २७ हजार १०० रुपये फिर्यादी यांनी भरली. शिनोलीकर यांनी फिर्यादी यांना ५२ लाख ५० हजार रुपये दिले. उर्वरित ८७ लाख २९ हजार रुपये देणे बाकी असताना त्यांनी हे फ्लॅट इतरांना विकून मिळालेली रक्कम स्वत: वापरून फिर्यादीची फसवणूक केली. सहायक पोलिस निरीक्षक भाबड तपास करीत आहेत.

Web Title: The woman bought 3 flats sold them to each other without paying 87 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.