पुणे तिथे काय उणे... भररस्त्यात मांडव टाकून नाचवल्या बारबाला, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 01:10 PM2022-02-21T13:10:52+5:302022-02-21T13:17:51+5:30

कोरोनाची तिसरी लाट नुकतीच ओसरली असली तरी अद्याप शासनाने लागू केलेले निर्बंध काही प्रमाणात दिसून येतात. आता, लग्नकार्य, धार्मिक सणसमारंभांना परवानगी देण्यात येत आहे

The video goes viral of barbala in pune, twitter tag to police | पुणे तिथे काय उणे... भररस्त्यात मांडव टाकून नाचवल्या बारबाला, Video व्हायरल

पुणे तिथे काय उणे... भररस्त्यात मांडव टाकून नाचवल्या बारबाला, Video व्हायरल

googlenewsNext

पुणे - राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि शिवमय वातावरणात शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. कोरोना नियमावलींमुळे या उत्सवात मिरवणूक काढण्यास सरकारने बंदी घातली होती. तसेच, अनेक ठिकाणी गर्दी न जमा होण्यासाठीही आदेश देण्यात आले होते. एकीकडे मिरवणुकांना बंदी असताना दुसरीकडे लग्नाच्या वरातीत चक्क फुटपाथवर बारबाला नाचविल्याची घटना उघडकीस आली आहे.

कोरोनाची तिसरी लाट नुकतीच ओसरली असली तरी अद्याप शासनाने लागू केलेले निर्बंध काही प्रमाणात दिसून येतात. आता, लग्नकार्य, धार्मिक सणसमारंभांना परवानगी देण्यात येत आहे. आता, मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, कोरोना हद्दपार झाल्याच्या अविर्भावात अनेकजण दिसून येतात. विविध कार्यक्रमात, किंवा लग्नसमारंभात माणसांची गर्दी होईल, अशा गोष्टी घडवून आणतात. नुकतेच, पुण्यातील एका लग्नसमारंभात चक्क बारबाला नाचविण्यात आल्याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. 

पुण्यातील सेनापती बापट रोड, वडारवाडी याठिकाणी एका लग्नाच्या मांडवामध्ये चक्क बारबाला नाचवल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामध्ये, काही तृथीयपंथी असल्याचंही समजतंय. ट्विटरवर एका युवकाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, मांडवात कुणीही मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत नाही. अशा नंगानाचचा हा कसा प्रकार, ऐन रस्त्यात रात्री 11.15 वाजता कोरोना नियम धाब्यावर बसवून अशी नाचगाणी सुरू असल्याचं या ट्विटवरील युवकाने म्हटले आहे. 


विशेष म्हणजे पुणेपोलिस अशा कार्यक्रमांना परवानगी देणार आहेत का? किंवा दिली आहे का? असा सवालही नागरिकांमधून विचारला जात आहे.

Web Title: The video goes viral of barbala in pune, twitter tag to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.