शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

रायगडचा अपरिचित इतिहास उलगडणार

By श्रीकिशन काळे | Updated: March 17, 2025 10:09 IST

रायगडचा मोडी कागदपत्रांमधील अपरिचित इतिहास ‘महाराजांचा रायगड’ या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. हे पुस्तक एप्रिल महिन्यात वाचकांच्या भेटीस येत आहे.

पुणे : स्वराज्याची राजधानी असलेला रायगड शिवकाळात कसा होता, तो दिसायचा कसा? त्याविषयीचे गुपित मोडी लिपीमध्येच दडलेले होते; पण आता हजारो मोडी लिपीच्या कागदपत्रांमधून त्यावेळचा रायगड प्रत्यक्षात कसा होता, ते थ्रीडीमधून शिवप्रेमींना अनुभवता येणार आहे, तसेच रायगडाचा इतिहास पुस्तक रूपातून देखील समोर येईल.

रायगडचा मोडी कागदपत्रांमधील अपरिचित इतिहास ‘महाराजांचा रायगड’ या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. हे पुस्तक एप्रिल महिन्यात वाचकांच्या भेटीस येत आहे. पुणे पुरालेखागारातील रायगडच्या हजारो मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून इतिहास संशोधक व मोडी लिपीतज्ज्ञ राज चंद्रकांत मेमाणे हे पुस्तक वाचकांच्या समोर घेऊन येत आहेत.  

याविषयी दुर्ग अभ्यासक-इतिहास संशोधक राज मेमाणे म्हणाले की, इसवी सन १७७३ ते १८१८ या कालावधीत पेशव्यांकडे रायगडचा कारभार होता. या कालावधीतील मोडी कागदपत्रांवर आधारित हे पुस्तक आहे. यातील काही कागदपत्रांवर आधारित संशोधन  यापूर्वी प्रकाशित झालेले आहे; परंतु ते अपूर्ण असून, महाराजांचा रायगड या पुस्तकात पूर्ण होणार आहे. त्यातून रायगडच्या अनेक अपरिचित पैलूंवर प्रकाश पडणार आहे. रायगड येथील शिवकालीन वास्तू जसे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा, महाराजांची तख्ताची सदर, विवेकसभा, कोठार आदी इमारतींचे बांधकाम कसे होते, त्यांची दुरुस्ती व बांधकाम कसे केले जात असे, आदींचे वर्णन कागदपत्रांमधून सापडते. 

थ्रीडी आराखडा मोडी कागदपत्रांतून किल्ले रायगडवरील बांधकामाच्या वर्णनावरून तसेच वापरलेल्या वस्तू यावरून त्रिमितीय (थ्रीडी) आराखडा दुर्ग अभ्यासक इतिहास संशोधक प्रसाद दांगट पाटील हे बनवत आहेत.भविष्यात रायगडवरील इमारतींचे पुनर्निर्माण झाल्यास या मोडी कागदातील माहितीचा आणि त्रिमितीय आराखड्याची मोठी मदत होणार आहे.वाडेश्वर मंदिराच्या बांधकामाला १७०० कौलेकुशावर्त तलावावरील वाडेश्वर मंदिराच्या बांधकामाला तेव्हा १७०० कौले लागली होती. त्याचप्रमाणे रायगडावर वास्तू, दरवाजे, बुरूज, पहारे आदी कोठे होते? याची माहिती या कागदपत्रांमधून समोर आली आहे. 

टॅग्स :RaigadरायगडFortगड