Pune: शेततळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू; धायरीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 13:28 IST2022-07-03T13:27:47+5:302022-07-03T13:28:33+5:30

पुणे : पुण्यातील धायरी येथे खंडोबा मंदिराजवळ असणाऱ्या शेत तळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरज शरद ...

The unfortunate death of two children by drowning on a farm Shocking incident in Dhayari | Pune: शेततळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू; धायरीतील धक्कादायक घटना

Pune: शेततळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू; धायरीतील धक्कादायक घटना

पुणे : पुण्यातील धायरी येथे खंडोबा मंदिराजवळ असणाऱ्या शेत तळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरज शरद सातपुते (वय 14) पुष्कर गणेश दातखिंडे (वय 13) दोघेही (रा. धायरी, नालंदा हायस्कुल शेजारी) अशी त्यांची नावे आहेत. 

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, धायरी येथील खंडोबा मंदिराजवळ असणाऱ्या रायकर मळ्यातील शेततळ्यात सकाळी ९. ३० वाजता दोन मुले पाण्यात बुडाल्याची वर्दि दलाच्या नियंत्रण कक्षास मिळाली. त्यानंतर तातडीने सिहंगड अग्निशमन केंद्र व पीएमआरडीए अग्निशमन केंद्र येथून दोन वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन वाहने पोहोचताच गळाच्या साहाय्याने दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
 

Web Title: The unfortunate death of two children by drowning on a farm Shocking incident in Dhayari