नांदेड सिटीत वाहनचालकाचा थरार! महिला गंभीर जखमी, २ ते ३ वाहनांना धडक; चालक पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 13:25 IST2024-07-24T13:24:46+5:302024-07-24T13:25:10+5:30
नांदेड सिटीतील डीसी मॉलजवळ वाहनावरील ताबा सुटल्याने चालकाने समोर असलेल्या दुचाकीवरील महिलेला धडक दिली, तसेच आणखी दोन ते तीन वाहनांना जोराची धडक दिली

नांदेड सिटीत वाहनचालकाचा थरार! महिला गंभीर जखमी, २ ते ३ वाहनांना धडक; चालक पोलिसांच्या ताब्यात
धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड सिटी येथे एका चारचाकी वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोर असलेल्या एका दुचाकीला तसेच दोन इतर चारचाकी वाहनांना जोराची धडक दिली. यात एक महिला गंभीर जखमी झाली असून हा अपघात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नांदेड सिटीतील डीसी मॉलजवळ घडला. याप्रकरणी संतोष शिवाजी गायकवाड (सध्या राहणार : धायरी, पुणे) या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचालक संतोष गायकवाड हे शिक्षक असून ते आपल्या चारचारकी वाहनाने मावळ येथे असणाऱ्या शाळेत निघाले होते. दरम्यान नांदेड सिटीतील डीसी मॉलजवळ आल्यानंतर त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्यांनी समोर असलेल्या दुचाकीवरील महिलेला धडक दिली. तसेच आणखी दोन ते तीन वाहनांना जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली. अपघात झाल्यानंतर जमलेल्या जमावाने वाहनचालक गायकवाड यांना जबर मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले असून वैद्यकीय चाचणीसाठी व उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. पुढील तपास हवेली पोलीस करीत आहेत.