संविधानातील मूल्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतोय - हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:41 IST2025-04-11T13:40:52+5:302025-04-11T13:41:07+5:30
महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई हे दोघंही ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढले, त्या प्रवृत्तींनी आज पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे

संविधानातील मूल्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतोय - हर्षवर्धन सपकाळ
पुणे : महात्मा फुले जयंतीनिमित्त महात्मा फुले वाडा येथे अभिवादन करण्यासाठी राज्यातून मंत्री, राजकीय पदाधिकारी येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीसुद्धा फुलेंना अभिवादन करण्यासाठी उपस्थिती लावली आहे. अभिवादन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. संविधानातील समता, सामाजिक न्याय, बंधुता ही मूल्य जी आहे. या सगळ्या मूल्यांना बाजूला सारण्याचाही कुठेतरी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होत असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.
सपकाळ म्हणाले, महात्मा जोतिबा फुले यांचे भारताच्या समाज व्यवस्थेमध्ये संविधानाच्या निर्माणमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. जी परिवर्तनाची समतेची, बंधुत्वाची, सामाजिक न्यायाची भूमिका आपल्या महान संविधानामध्ये संमेलित झाली. याची ज्योत याची तेवत ठेवण्याचं किंबहुना हस्तांतरित करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले तथा फुले दाम्पत्यांनी केलेल आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो वारसा आणि वसा हा बहुजन समाजालाच नव्हे तर आपल्या सर्वांना पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. मात्र महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई हे दोघंही ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढले. त्या प्रवृत्तींनी आज पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे.
संविधानातील समता, सामाजिक न्याय, बंधुता ही मूल्य जी आहे. या सगळ्या मूल्यांना बाजूला सारण्याचाही कुठेतरी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होत आहे. आणि आज या निमित्तानं याठिकाणी प्रांताध्यक्ष या नात्यानं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत याठिकाणी येण्याचं विशेष कारण की, महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो वैचारिक संघर्ष आहे जो वैचारिक मशाल आहे. ती कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही. आणि आगामी काळात काँग्रेस ही वैचारिक लढाई लढणार आहे. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो आदर्श आहे. तो आम्हाला शिरसावंद्य आहे. एवढंच आज अभिवादन करत असताना या निमित्तानं आपल्याला सांगावसं वाटतंय.
महात्मा फुलेंचा जो विचार आहे तो विचार आज पुन्हा एकदा त्या विचाराने संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. आत्ताच याठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितलं की, पूर्वी तसं होत होतं आज होत नाही. आणि हे सांगत असताना त्यांनी आज ही जो भेदाभेद होत आहे. ज्या शाळा ज्या आहेत सरकारी शाळा त्या बंद होत आहेत. महिलांवर अत्याचार जे वाढत आहेत. याला मात्र त्यांनी बगल दिली. अत्याचार तेव्हा जे होत होते ते कोणत्या विचारसणीमुळे होत होते. या स्वयंसेवक संघाच्या बंच ऑफ थॉट या पुस्तकांमध्ये या विचारसरणीचा उल्लेख आहे. भाजपसाठी त्यांचं बायबल म्हणजे बंच ऑफ थॉट आहे. महिलांनी शिकू नये हे त्यामध्ये मान्य केलेला आहे.