शरद मोहोळवर गोळ्या झाडणार्‍या एका शार्प शूटरचे नाव निष्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 05:52 PM2024-01-05T17:52:19+5:302024-01-05T17:52:32+5:30

साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याने त्याच्या इतर साथीदारांसह शरद मोहोळ याच्यावर आज पुण्यातील कोथरूड भागात गोळीबार केला

The name of a sharp shooter who shot at Sharad Mohol has been revealed | शरद मोहोळवर गोळ्या झाडणार्‍या एका शार्प शूटरचे नाव निष्पन्न

शरद मोहोळवर गोळ्या झाडणार्‍या एका शार्प शूटरचे नाव निष्पन्न

किरण शिंदे 

पुणे: शरद मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱ्या ३ आरोपींपैकी एका आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असे आरोपीचे नाव आहे. पोळेकर याने त्याच्या इतर साथीदारांसह शरद मोहोळ याच्यावर आज पुण्यातील कोथरूड भागात गोळीबार केला. उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल कोथरूड आणि ससून हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान मोहोळ याला मृत घोषित करण्यात आले. गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपीचा शोध सुरु असून पुढील तपास सुरू आहे. 

आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. शरद मोहोळचा आज लग्नाचा वाढदिवस होता. तो मंदिरात चालला होता. त्यावेळी अज्ञातांनी मोहोळवर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गोळ्या झाल्यानंतर आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. रुग्णालय परिसरात त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. 

कोण आहे शरद मोहोळ?

शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केल्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक झाली. येरवडा कारागृहात शरद मोहोळने विवेक भालेराव याच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागाचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकीचा खून केला. या प्रकरणात शरद मोहोळला जामीन मिळाला. मात्र बाहेर आल्यानंतर त्याची गुन्हेगारी कृत्य सुरुच होती. जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडिपार करण्यात आले होते.

Web Title: The name of a sharp shooter who shot at Sharad Mohol has been revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.