शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

"विलिनीकरणाची चर्चा थांबलेली नाही, ते होणार; आम्ही सगळे सकारात्मक आहोत", आमदार सुनील शेळकेंनी मांडली स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 17:32 IST

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही पक्षाचे विलिनीकरण ठरले होते, अशी चर्चा अजित पवारांच्या निधनांनंतर सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अशी काही चर्चा झाली नसल्याचे म्हटले. मात्र, अजित पवारांच्या जवळ राहिलेले आमदार सुनील शेळके यांनी मात्र वेगळी माहिती देत भूमिका मांडली आहे. 

"विलिनीकरणाची चर्चा थांबलेली नाहीये. विलिनीकरण होईल, याबद्दल कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. त्याला देखील आम्ही सगळेजण सकारात्मकच आहोत", असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी दोन्ही गटांचे विलिनीकरण पुढील १०-१५ दिवसांमध्ये होणार असल्याचे विधान केले. 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आमदार सुनील शेळके यांनी सांगितले की, "अजित पवारांचे अकाली जाणं कुणालाही मान्य नाही. पण, काही तांत्रिक बाबी असल्याने हे करावं लागत आहे. उपमुख्यमंत्री पदाची प्रक्रिया पार पडल्यानंतर दहा-पंधरा दिवसांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं, हा प्रस्ताव असेल किंवा इतर खात्याची जबाबदारी कुणाला द्यायची. मग त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा अजित पवारांची असेल. या सगळ्या प्रक्रिया पुढच्या १५ दिवसांनी केल्या जातील."

"...म्हणून शपथविधीची घाई आम्हाला करावी लागली"

पक्षाचा अध्यक्ष कोण असावं, कारण प्रफुल्ल पटेलांनी देखील त्याबद्दल इच्छा व्यक्त केली आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर आमदार शेळक म्हणाले की, "हा पक्ष अजित पवारांचा आहे आणि काही जरी झाले तरी राष्ट्रीय अध्यक्ष पवार कुटुंबातीलच व्यक्ती होईल. सुनेत्रा वहिनींकडे सूत्रे देणे, हीच अजित पवारांना आमच्याकडून दिलेली श्रद्धांजली असेल. सुनेत्रा पवार या खऱ्या अर्थाने या राजकीय पक्षाच्या वारसदार असतील, असे माझं व्यक्तिगत मत आहे."

"प्रत्येक पक्षाच्या घटना ज्या आहेत, त्या वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेल्या असतात. जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना होती, त्यानुषंगाने ही सगळी प्रक्रिया आम्हाला चौथ्या दिवशी करण्याची वेळ आलेली आहे. ही घाई करण्याची वेळ आमच्या पक्षाच्या घटनेमुळे आहे. आणि काही तांत्रिक अडचणींमुळे करावी लागलेली आहे", आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.   

"शपथविधीनंतर सुनेत्रा पवार बारामतीला जातील. त्यानंतर काय निर्णय घ्यायचे, ते १२-१५ दिवसांनी... मग दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय असेल. मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा आहे, कोणाला कोणत्या खात्याची जबाबदारी द्यायची आहे, ही सगळी प्रक्रिया पंधरा दिवसांनी केली जाईल", अशी माहिती त्यांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Merger talks ongoing, inevitable; we are positive: MLA Sunil Shelke

Web Summary : MLA Sunil Shelke stated that the NCP factions' merger will occur soon, addressing technical issues requiring a swift oath ceremony. He suggested Sunetra Pawar as the party's successor, believing the national president should remain within the Pawar family. Decisions on cabinet positions will follow.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMLAआमदार