नराधम बापच निघाला गुन्हेगार; सात वर्षांच्या बालिकेचा घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 20:16 IST2022-09-28T20:16:28+5:302022-09-28T20:16:58+5:30

मुलीचे अपहरण झाल्यावर बापानेच खून केल्याची खळबळजनक माहिती समोर आली

The father turned out to be a criminal A seven year old girl was killed | नराधम बापच निघाला गुन्हेगार; सात वर्षांच्या बालिकेचा घेतला जीव

नराधम बापच निघाला गुन्हेगार; सात वर्षांच्या बालिकेचा घेतला जीव

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथून एक सात वर्षाची बालिका मंगळवार २७ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाली होती. तिचा शोध शिक्रापूर पोलीस करत असतांना शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सदर बालिकेच्या वडिलांनी तिचा खून केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

 शिक्रापूर ता. शिरूर येथील बजरंगवाडी येथून (अपेक्षा युवराज सोळुंके वय ७ वर्षे) ही बालिका मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बेपत्ता झाली होती. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी अनेक ठिकाणी तिचा शोध घेतला. मात्र मुलगी मिळाली नाही. दरम्यान मुलगी बेपत्ता झाल्याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज सदर घटनेचा तपास करत असताना अनेक ठिकाणी सीसीटिव्ही तपासले असता मुलीच्या वडिलांनी मुलीला नदीच्या कडेला नेल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता मुलीच्या वडिलांनीच मुलीला वेळ नदीच्या पाण्यात फेकून दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी वेळ नदीपात्रात धाव घेत पाहणी केले असता मुलीच्या चपला मिळून आल्या. मात्र मुलीचा मृतदेह सायंकाळी उशिरापर्यंत मिळून आलेला नाही. तर शिक्रापूर पोलिसांनी मुलीचे वडील युवराज सोळुंके यास ताब्यात घेतले असून पुढील तपास शिक्रापूरचे  पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.

Web Title: The father turned out to be a criminal A seven year old girl was killed