कुख्यात गुंड टिपू पठाणच्या अनाधिकृत ऑफीसचे बांधकाम काळेपडळ पोलीसांनी केले उध्वस्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 17:18 IST2025-09-26T17:17:51+5:302025-09-26T17:18:03+5:30
सय्यदनगर भागात बेकायदेशीर बांधकाम केलेले ऑफीस, टपरी व इतर अनाधिकृत अतिक्रमण पोलिसांनी उध्वस्त केले

कुख्यात गुंड टिपू पठाणच्या अनाधिकृत ऑफीसचे बांधकाम काळेपडळ पोलीसांनी केले उध्वस्थ
हडपसर: कुख्यात गुंड रिझवान ऊर्फ टिप् सत्तार पठाण याचे अनाधिकृत ऑफीसचे बांधकाम काळेपडळ पोलीसांनी कारवाई करून उध्वस्थ केले. कुख्यात गुंड रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण, रा. सय्यदनगर, हडपसर याचेवर काळेपडळ पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अन्वये दाखल असून त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
कुख्यात गुंड टिपु पठाण याचे वर्चस्व असलेल्या हडपसर येथील सय्यदनगर भागात बेकायदेशीर बांधकाम केलेले ऑफीस, टपरी व इतर अनाधिकृत अतिक्रमण बाबत काळेपडळ पोलीसांनी माहिती प्राप्त करुन सय्यदनगर येथील ख्वाजा मंजील इमारतीवर त्याने अनाधिकृतपणे बांधकाम केले होते. त्याचे ऑफीस, टपरी व इतर अनाधिकृत बांधकाम काळेपडळ पोलीस स्टेशन व अतिक्रमण विभाग महानगरपालिका यांनी संयुक्त कारवाई करुन बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करुन जमीनदोस्त केले. ही कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५, पुणे शहर, सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक (गुन्हे), काळेपडळ पोलीस स्टेशन व काळेपडळ पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार व अतिक्रमण विभाग पुणे महानगरपालिका यांचे मदतीने करण्यात आली आहे.अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली आहे.