मुलांनीच बनावट बक्षिसपत्र केले अन् वडिलांना फसवून घराबाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 17:58 IST2025-09-09T17:58:20+5:302025-09-09T17:58:27+5:30

अन्नछत्रात खाण्याची वेळ आलेल्या ज्येष्ठाच्या कायदेशीर लढ्याला अखेर तीन वर्षांनी यश मिळाले

The children made fake prize certificates and tricked their father into leaving the house. | मुलांनीच बनावट बक्षिसपत्र केले अन् वडिलांना फसवून घराबाहेर काढले

मुलांनीच बनावट बक्षिसपत्र केले अन् वडिलांना फसवून घराबाहेर काढले

पुणे : आजवर प्रॉपर्टीसाठी आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकणारी मुले पाहिली आहेत, पण बनावट बक्षिसपत्र करून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला स्वतःच्या मुलांनीच घराबाहेर काढण्याचा वेदनादायी प्रकार घडला. अन्नछत्रात खाण्याची वेळ आलेल्या ज्येष्ठाच्या कायदेशीर लढ्याला अखेर तीन वर्षांनी यश मिळाले. न्यायालयाने मुलांनी फसवून केलेलं बनावट बक्षिसपत्र रद्द केले आणि ज्येष्ठाचा मालमत्तेवरील हक्क पुन्हा त्यांच्या नावे मिळाला.

सुरुवातीला मुलांनी आम्ही तुमची व्यवस्थित देखभाल करू व काळजी घेऊ'' असा शब्द देत वडिलांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर बनावट बक्षिसपत्र तयार केले आणि सगळ कागदोपत्री झाल्यानंतर मुलांनी वडिलांना घराबाहेर बाहेर काढले. वडिलांना अन्नछत्रात खाण्याची वेळ आली. या घटनेनंतर अ‍ॅड. प्रकाश एकनाथ सिंदेकर आणि अ‍ॅड. प्रणाली रामदास बारगळ यांनी या प्रकरणात पुढाकार घेत पुण्यातील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आणि तीन वर्षाच्या चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर अखेर न्यायालयाने ज्येष्ठ नागरिकाच्या बाजूने निर्णय दिला आणि मुलांनी फसवून केलेलं खोटं बक्षीसपत्र न्यायालयाने रद्द केले.

हा केवळ एक दावा नव्हता, तर एका ज्येष्ठ नागरिकाच्या न्यायासाठीचा लढा होता. समाजात ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात हा निकाल एक सकारात्मक पाऊल आहे.”त्यामुळे अशा प्रकारातून मुलांनी फसवून आईवडिलांची आयुष्याची कमाईची उधळण करून त्यांना रस्त्यावर आणणे अतिशय खेदाची बाब आहे.यातून ज्येष्ठ नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे- अ‍ॅड. प्रकाश सिंदेकर आणि अ‍ॅड. प्रणाली बारगळ

Web Title: The children made fake prize certificates and tricked their father into leaving the house.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.